Shocking! विकृतीचा कळस: दिल्लीत 87 वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार; कुटुंबियांच्या तक्रारीनंतर तपास सुरु
अशा परिस्थितीत आता बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यानुसार तपास सुरू आहे
याला कलियुग म्हणावे की वासनेमुळे आलेले आंधळेपण… जिथे आजीच्या वयाची महिलासुद्धा सुरक्षित नाही. लहान मुली, महिला, तरुणी यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतात, परंतु आता एका व्यक्तीने चक्क 87 वर्षांच्या महिलेवर बलात्कार (Rape) केला आहे. राजधानी दिल्लीतील (Delhi) टिळक नगरमधून हे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, कोणी इतक्या खालच्या पातळीला कसे पोहचू शकते?
रविवारी ही 87 वर्षीय वृद्ध महिला घरात एकटी असताना ही घटना घडली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या 65 वर्षांच्या मुलीसोबत तिच्या घरात राहते. ही मुलगी फिरायला गेली असताना ही घटना घडली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वृद्ध महिलेची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे ती नेहमी बेडवर पडून असते. यासोबत तिचा एक पाय देखील काम करत नाही. यादरम्यान साधारण साडे बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात घुसून वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. दीडच्या सुमारास हा व्यक्ती घरातून बाहेर पडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आधी घरच्यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता, मात्र आता त्यांनी वृद्ध महिलेसोबत बलात्कार झाल्याची तक्रारही दाखल केली आहे. अशा परिस्थितीत आता बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यानुसार तपास सुरू आहे. या तकारीनंतर पोलीस सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत जेणेकरून आरोपीचा शोध घेता येईल. (हेही वाचा: 99 वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार; 48 वर्षीय केअरटेकरचे विकृत कृत्य, सुनावली जन्मठेपेची शिक्षा)
दरम्यान, आयएएनएस या वृत्तसंस्थेने मिळवलेल्या आकडेवारीनुसार, 2020 च्या तुलनेत ऑक्टोबर 2021 पर्यंत राष्ट्रीय राजधानीत महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत शहरात 1,725 महिलांवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत अशा प्रकरणांची संख्या 1,429 होती. 2020 च्या आकडेवारीच्या तुलनेत 2021 मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढले आहे.