Coronavirus: कंन्टेनमेंट झोन वगळून इंटरटेन्मेंट्स पार्क आणि त्यासारख्या ठिकाणांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून SOP ; 8 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

09 Oct, 05:25 (IST)

कंन्टेनमेंट झोन वगळून  इंटरटेन्मेंट्स पार्क आणि त्यासारख्या ठिकाणांसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून SOP जाहीर करण्यात आली आहे.

09 Oct, 05:17 (IST)

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 1278 रुग्ण आढळले आहेत.

09 Oct, 05:06 (IST)

IPL 2020: सनराइज हैदराबाद यांचा 69 धावांनी किंग्स इलेव्हन पंजाबच्या विरोधात लढवण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यात विजय झाला आहे.

09 Oct, 04:52 (IST)

अंदमान आणि निकोबार येथे कोरोनाचे आणखी 17 रुग्ण आढळले आहेत.

09 Oct, 04:44 (IST)

दिल्ली आणि राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात उद्या झेंडा Half Mast पर्यंत फडकवला जाणार आहे.

09 Oct, 04:29 (IST)

रामविलास पासवान यांच्या निधनावर, 'रामविलास पासवान यांचे मन मोठे होते. त्यांनी आपली लोक जनशक्ती पार्टी मजबूत केली आणि देशात दलित सैन्य उभारणीसाठी काम केले. आपल्या देशातील एका दलित नेत्याने आज आपल्याला सोडले आहे, हे आपल्या समाजाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो', अशा शब्दांत युनियन मिनिस्टर रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

09 Oct, 04:01 (IST)

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधानामुळे योग गुरु रामदेव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

09 Oct, 03:45 (IST)

केंद्रीय मंत्रीमंडळाची उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडणार  आहे.

09 Oct, 03:14 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे  श्रद्धांजली वाहिली आहे.

09 Oct, 02:52 (IST)

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

&nbs

p;

09 Oct, 02:44 (IST)

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधानानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

09 Oct, 02:19 (IST)

केंद्रीय मंत्री आणि LJP नेते रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा चिराग पासवान यांनी ट्विटद्वारे ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

09 Oct, 02:16 (IST)

मुंबईत आज 2823 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या 2,22,761 इतकी झाली आहे. त्यापैकी 1,86,675 प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या शहरात 24,789 सक्रीय रुग्ण आहेत. तर 9293 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

09 Oct, 01:56 (IST)

राज्यात मागील 24 तासांत 13,395 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून 358 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15,575 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या नव्या वाढीमुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा  14,93,884 वर पोहचला आहे. त्यापैकी 11,96,441 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी राज्यात केवळ 2,41,986 सक्रीय रुग्ण आहेत. तर एकूण 39,430 मृतांची नोंद झाली आहे. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

09 Oct, 01:16 (IST)

पंजाब मध्ये आज 930 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1,21,716 वर पोहचला आहे. त्यापैकी 10,775 सक्रीय रुग्ण असून एकूण 3,741 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

09 Oct, 24:54 (IST)

बिहार निवडणूकांसाठी JMM ने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

09 Oct, 24:32 (IST)

IPL 2020, SRH vs KXIP सामन्यात सनरायझर्स हैदराबाद ने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

09 Oct, 24:02 (IST)

उत्तर प्रदेश मध्ये आज 3,376 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला आहे. या वाढीमुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 4,27,459 वर पोहचला आहे. त्यापैकी 42,552 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर एकूण 6,245 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

08 Oct, 23:25 (IST)

हरियाणा: रोहतक जिल्ह्यातून 5 किलो 100 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी केली जात आहे.

08 Oct, 23:07 (IST)

पंजाब: किसान कायद्याच्या विरोधात अमृतसरमध्ये सुरु असणाऱ्या किसान मजदूर संघर्ष समितीच्या 'रेल रोको' आंदोलनाचा आज 15 वा दिवस आहे.

Read more


कोरोना व्हायरस संकटावर मात करणारे औषध, लस यांची अद्यापही प्रतिक्षा आहे. तरीही भारतातून एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील कोरोना व्हायरस रुग्णसंख्या घटत आहे. कोरोना व्हयरस संसर्गापेक्षा उपचार घेऊन बरे होणाऱ्या आणि रुग्णायातून सुट्टी (डिस्चार्ज) मिळणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातही बऱ्याच प्रमाणावर असेच चित्र आहे. दरम्यान, असे असले तरी राज्यासह देशातील हे चित्र अभासी आहे की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

राज्यातील रुग्णवाढीचा दर दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे. मात्र हे प्रमाण घटत असले तरी बाधितांचे प्रमाण अद्यापही पहिल्यासारखे 20% च्या आसपासच आहे. प्राप्त आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आढवड्यात असलेली रुग्णसंख्या पाहता त्या तुलने ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या बरीच कमी असल्याचे आकडेवारी सांगते.

एका बाजूला जग कसेबसे कोरोना व्हायरस संकटातून सावरत असताना दुसऱ्या बाजूला अमेरिका आक्रमक झाला आहे. अमेरिकेने कोरोना व्हायरस उद्रेकासा संपूर्ण दोष चीनच्या माथी मारला असून, चीनला हे भारी पडेल असा थेट संदेश दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. त्यानंतर काही दिवस उपचार घेऊन ते व्हाईट हाऊसमध्ये परतले. ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसमध्येच पुढील उपचार सुरु आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी देशवासियांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत असताना चीनला संदेश दिला.

देशभरात कोरोनाचा कहर सुरु असताना बिहार विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक 2020 साठी निवडणूक आयोगाने आदर्श अचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अनेक राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर बिहारमध्ये एक वेगळा संघर्ष पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष म्हणून विरोधकांशी लढतानाच उमेदवारांना आपल्याच पक्षातील उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची मनधरणी करावी लागत आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे.

महाराष्ट्रातही येत्या काही काळात विविध निवडणुका पार पडत आहेत. याची अद्याप घोषणा झाली नसली तरी ती लवकरच होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, कोरोना व्हायरस संकट कायम असताना महाराष्ट्र सरकार हळूहळू अनलॉक करत आहे. आतापर्यंत विविध व्यवसाय, सेवा, उद्योग सुरु करण्यास सरकारने सशर्थ परवानगी दिली आहे. राज्यातील चित्रपटगृहेही लवकरच सुरु होणार असल्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरस, जागतिक, स्थानिक राजकारण, शेती, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, क्रीडा, संस्कृती, यांसह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींचा ताजा तपशील पाण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉगसोबत जोडलेले राहा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now