7th Pay Commission: नव्या वर्षात 'या' सरकारी कर्मचा-यांना पगार आणि डीए मध्ये मिळणार घसघशीत वाढ

मात्र हा लाभ ठराविक सरकारी कर्मचा-यांनाच होणार आहे.

7th Pay Commission (File Image)

यंदाचे वर्ष हे सर्वांसाठीच म्हणावे तितके चांगले नव्हते. अनेक नोकरदार वर्गाच्या पगारात कपात करण्यात आली तर कित्येकांच्या नोक-या देखील गेल्या. लॉकडाऊनचा हा फटका सरकारी कर्मचा-यांना देखील थोड्याफार प्रमाणात बसला. मात्र आता येणारे नवीन वर्षी सरकारी सेवेत काम करणा-या काही ठराविक कर्मचा-यांसाठी (Government Servant) आनंदवार्ता घेऊन घेत आहे. ज्यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) त्यांच्या पगारात आणि डीएमध्ये (DA) वाढ करण्यात आली आहे. मात्र हा लाभ ठराविक सरकारी कर्मचा-यांनाच होणार आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार, 1 ऑक्टोबरपासून सर्व अनुसूचित रोजगारचे अकुशल, अर्धकुशल आणि कुशल श्रेणी च्या कर्मचा-यांना न्यूनतम वेतन आणि डीए मध्ये वाढ केली जाईल.हेदेखील वाचा-BOI Recruitment 2020 for Officer Posts: बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; bankofindia.co.in वर करा 21 डिसेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज!

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारने अकुशल श्रमिकांसाठी 15,492 रुपये, अर्धकुशल साठी 17,069 रुपये आणि कुशल कर्मचा-यांसाठी 18,797 रुपये असा पगार निर्धारित करण्यात आला आहे.

तसेच लिपिक आणि पर्यवेक्षी कर्मचा-यांच्या पगारात देखील वाढ करण्यात आली आहे. यात गैर-मैट्रिक्युलेशन ला महिना पगार 17,069 रुपये मिळणार आहे. तर मेट्रिक पास मात्र गैर स्नातक यांना मासिक वेतन 18,797 रुपये मिळेल. तर स्नातक आणि त्यावर पदावर असलेल्यांना मासिक वेतन 20,430 रुपये मिळेल.

कोरोना व्हायरसमुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए मध्ये काही वाढ करण्यात आलेली नाही. वर्षातून दोनदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आपल्या कर्मचा-यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता दिला जातो. ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करता येईल.