IPL Auction 2025 Live

7th Pay Commission: अर्थसंकल्प 2020 मध्ये केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना DA ते पगार वाढ काय - काय मिळू शकते?

तर उद्या 1 फेब्रुवारी दिवशी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

7th Pay Commission (File Image)

लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2020 आज (31 जानेवारी) पासून सुरू होणार आहे. तर उद्या 1 फेब्रुवारी दिवशी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठ्या आपेक्षा आहेत. मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली केंद्र सरकारी ग्रुप डी विभागातील कर्मचार्‍यांचे किमान वेतन आणि डीए (महागाई भत्ता) वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही मोठ्या घोषणा यंदा बजेट 2020 होण्याबाबत केंद्र सरकारी कर्मचारी आशादायी आहेत. रेल्वेकर्मचार्‍यांसाठीदेखील यंदाच्या बजेटमध्ये काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. Budget 2020: आगामी अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना मिळू शकते मोठी खूषखबर; इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदलाची शक्यता.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे कर्मचार्‍यांनी काही विशेष सोयी-सुविधांची घोषणा होऊ शकते. यामध्ये रेल्वे कर्मचार्‍यांवर अवलंबून असणार्‍या त्यांच्या कुटुंबियांना मेडिकल आणि प्रिव्हिलेज पास फेसिलिटी मिळू शकते. दरम्यान नियमांनुसार केंद्रीय कर्माचार्‍यांना महागाई भत्ता दर जानेवारी महिन्यात जाहीर केली जाते. जानेवारी 2020 चा डीए यंदा अद्याप जाहीर झालेला नाही. Union Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?  

सरकारी कर्मचार्‍यांना पगारवाढीची खूषखबर मिळण्याचि शक्यता नाही. अद्याप किमान वेतनवाढीच्या प्रस्तावावर चर्चा झालेली नाही मागील काही दिवसांपासून सातव्या वेतन आयोगानुसार ग्रुप डी कर्मचार्‍यांना 18,000 रूपयांवरून 26,000 रूपये करण्याचा प्रस्ताव आहे.मात्र त्याबाबत सरकारची अन उत्सुकता पाहता केंद्र कर्मचार्‍यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान उद्या (1 फेब्रुवारी) दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये सादर करतील. तर आज आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे. आर्थिक मंदीमध्ये असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला चलना देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.