7th Pay Commission: केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतन धारकंना आता SMS, WhatsApp द्वारा मिळू शकणार Monthly Pension Slip
Ministry of Personnel, Public Grievances and Pensions कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, त्यांनी बॅंकांनाच पेन्शनर्सच्या स्लीप या ऑनलाईन देण्याची सुविधा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकार कडून महागाई हफ्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक सेवानिवृत्तीधारकांना DA, DR Arrears ची प्रतिक्षा आहे. पण त्या निर्णयापूर्वी या पेन्शनर्सना त्यांनी एक दिलासादायक माहिती आहे. आता केंद्र सरकारच्या पेन्शनर्सना त्यांची पेंशन स्लीप (Monthly Pension Slips) घेण्यासाठी फेरी मारण्याची गरज नाही. ही स्लिप प्रत्येक महिन्याला इमेल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप द्वारा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 7th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारी कर्मचारी, निवृत्तीधारकांसाठी मोठी बातमी; DA Installment, Arrears जुलै नव्हे तर 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता,
Ministry of Personnel, Public Grievances and Pensions कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, त्यांनी बॅंकांनाच पेन्शनर्सच्या स्लीप या ऑनलाईन देण्याची सुविधा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याकरिता रजिस्टर मोबाईल क्रमांक वापरला जाणार आहे. यावर डिजिटल पेन्शन स्लीप मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मीटिंगमध्ये Ministry’s department of pension and pensioners welfare कडून सेवानिवृत्ती धारकांचा त्रास थोडा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.
पेन्शन खात्यामध्ये जमा झाल्यानंतर त्याचे अलर्ट्स देण्याच्या बॅंकांना सूचना करण्यात आल्या आहे. मोबाईल क्रमांकावर आणि ज्यांचे उपलब्ध आहेत त्यांचे इमेल आयडी वर ही स्लीप पाठावली जाणार आहे. बॅका व्हॉट्सअॅप सारखं सोशल मीडीया प्लॅटफॉर्म देखील वापरू शकते.यामध्ये प्रत्येक महिन्याची पेन्शन आणि त्याचे संपूर्ण डिटेल्स असतील. यामध्ये कोणती रक्कम किती आहे? त्यामध्ये काही टॅक्स कापला आहे का? हे देखील सांगितलं जाणार आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचे पगार आणि पेंशन ही सातव्या वेतन आयोगानुसार दिली जाते. त्यामुळे आता या निर्णयामुळे अनेक वयोवृद्धांना फायदा मिळणार आहे. बॅंकेकडूनही सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे.