7th Pay Commission: मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना देणार नव्या वर्षात पुन्हा पगारवाढीचं गिफ्ट?

केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना जानेवारी 2022 मध्ये एचआरए (HRA) मध्ये वाढ मिळू शकते.

7th Pay Commission | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय कर्मचार्‍यांना मोदी सरकार कडून पुन्हा पगारवाढीचं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. नव्या वर्षामध्ये मोदी सरकार कडून अजून एका गिफ्टची कर्मचार्‍यांना अपेक्षा आहे. यंदाच्या दिवाळी पूर्वीच केंद्रीय कर्मचार्‍यांना महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करून देण्यात आली आहे. आता रिपोर्ट्स नुसार, केंद्र सरकार हाऊस रेंट अलाऊंस (House Rent Allowance) वाढवण्याच्या तयारी मध्ये आहे. केंद्र सरकारी कर्मचार्‍यांना जानेवारी 2022 मध्ये एचआरए (HRA)  मध्ये वाढ मिळू शकते.

अर्थमंत्रालय कडून 11.56 लाख पेक्षा जास्त कर्मचार्‍यांच्या हाऊस रेंट अलाऊंस मध्ये वाढ करण्याची तयारी सुरू झाली आहे. सध्या अप्रुव्हल साठी रेल्वे बोर्डाकडे देखील प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर कर्मचार्‍यांना जानेवारी 2022 मध्ये वाढीव एचआरए मिळू शकतो. Indian Railway Technical Supervisors Association आणि National Federation of Railwaymen यांच्याकडून जानेवारी 2021 पासून वाढीव एचआरए लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात पुन्हा दमदार वाढ होण्याची शक्यता आहे. 7th Pay Commission: महागाई भत्तामध्ये 3% वाढ; पहा प्रति महिना, वर्षाला किती होणार पगारवाढ इथे घ्या जाणून .

ज्या शहराची लोकसंख्या 50 लाख पेक्षा अधिक आहे ते शहर 'X'कॅटेगरी मध्ये येते. 5 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येचं शहर 'Y' कॅटेगरी मध्ये येते तर 5 लाखापेक्षा कमी लोकसंख्येचं शहर 'Z'कॅटेगरी मध्ये येतं. या तिन्ही शहरात किमान एचआरए 5400,3600 आणि 1800 आहे. Department of Expenditure च्या माहितीनुसार, जेव्हा डीए 50% ला पोहचतो तेव्हा कमाल हाऊस रेंट अलाऊंस हा 30% वाढण्याची गरज असते.