IPL Auction 2025 Live

7th Pay Commission: कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

मेमोरेंडमनुसार कोरोना व्हायरस (कोविड-19) संक्रमणामुळे उत्पन्न झालेली स्थिती विचारात घेऊन एपीएआर रिकॉर्डिंग कालावधी काही दिवस स्थगित करुन त्याचा कालावधी वाढविण्यात येत आहे.

Indian Rupee | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

7th CPC: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करत असताना अवघा देश लॉकडाऊन झाला आहे. अर्थव्यवस्थेचे चाक थांबल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांना सेल्फ अप्रायजल म्हणजेच वार्षिक कामगिरी मूल्यांकन अहवाल (APAR) फाईल करण्याचा कालावधी वाढवून मिळाला आहे. एपीएआर करण्याची शेवटची मुदत आता 30 जून इतकी असणार आहे. ही मुदत या आधी 15 एप्रिल इतकी होती.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एका ऑफिस मेमोरेंडममध्ये 27 मार्च 2020 या दिवशी याबाबत माहिती दिली आहे. मेमोरेंडमनुसार कोरोना व्हायरस (कोविड-19) संक्रमणामुळे उत्पन्न झालेली स्थिती विचारात घेऊन एपीएआर रिकॉर्डिंग कालावधी काही दिवस स्थगित करुन त्याचा कालावधी वाढविण्यात येत आहे. (हेही वाचा, Coronavirus: आयकर परतावा, आधार-पॅन लिंक करण्यास केंद्राकडून 30 जून पर्यंत मुदतवाढ, अडचणीत सापडलेल्या उद्योगासाठी पॅकेज जाहीर करणार: निर्मला सीतारमण)

केंद्रीय सेवेतील ए श्रेणी अधिकाऱ्यांसंबंधी मुल्यांकन अहवाल जमा करण्याची समयसीमा वाढवण्यात आली आहे. आगोदरच्या कार्यक्रमानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांसाठी रिक्त एपीएआर वितरण तारीख 31 मार्च होती. ही तारीख वाढवून ती 31 मे 2020 अशी करण्यात आली आहे. याशिवाय इतर कर्मचाऱ्यांद्वारे रिपोर्टींग अधिकाऱ्यांचा मुल्यांकन अहवाल सादर करण्याची अंतिम तिथी 15 एप्रिलवरून वाढवून ती 30 जून करण्यात आली आहे.