परीक्षेसंदर्भात 755 विद्यापीठांकडून उत्तर तर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये परीक्षा घेण्यासाठी 366 विद्यापीठांकडून योजनांची आखणी- UGC
या दरम्यान युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने परीक्षांसदर्भातील स्थिती जाणून घेण्यासाठी देशभरातील विद्यापीठांशी संपर्क साधला होता.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे देशभरातील महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटी यांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत संभ्रम सुरु आहे. या दरम्यान युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने (University Grants Commission) परीक्षांसदर्भातील स्थिती जाणून घेण्यासाठी देशभरातील विद्यापीठांशी संपर्क साधला होता. त्यावर सुमारे 755 विद्यापीठांनी प्रतिक्रीया दिली आहे. यात 120 डीम्ड युनिव्हर्सिटी, 274 खाजगी, 40 केंद्र आणि 321 राज्य विद्यापीठांचा समावेश आहे. यातील 194 महाविद्यालयांनी यापूर्वीच परीक्षा घेतल्या आहेत. तर 366 युनिव्हर्सिटीज ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये परीक्षा घेण्यासाठी योजना आखत आहेत. अशी माहिती युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने दिली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या गाईडलाईन्सनुसार, महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी 30 सप्टेंबर पर्यंत युजी आणि पीजी कोर्सेच्या अंतिम वर्षांच्या किंवा सेमिस्टरच्या परीक्षा होणे गरजेचे आहे. परंतु, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यूजीसीच्या या नियामांबद्दल अनेक राज्यांमध्ये असमंजस्याची भावना आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, ओडिशा, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी विद्यापीठांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
ANI Tweet:
विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी युजीसी सर्व राज्यांना आवाहन करत आहे. त्याचबरोबर ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून विद्यापीठांच्या परीक्षा घ्या, असेही सांगण्यात येत आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत परीक्षा घेण्यासंदर्भात न्यायलयात सुनावणी सुरु आहे. या संदर्भात केंद्र, युजीसी आणि दिल्ली युनिव्हर्सिटीच्या परीक्षा करण्याच्या गाईडलाईन्सवर दिल्ली हायकोर्टाने उत्तर मागितले आहे.