पुण्यातील रुग्णवाहिका मिळत नसल्यास अधिकाऱ्यांना वाहनांमध्ये फिरण्याचा अधिकार नाही - मनसे नगरसेवक वसंत मोरे; 7 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, पुणे सह देशा- परदेशातील घडामोडी, राजकीय बातम्या आणि कोरोना व्हायरसचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

08 Sept, 05:34 (IST)

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णवाहिकेसाठी साडेतीन तास  अधिक वाट पाहावी लागल्याने मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आज अधिकाऱ्यांच्या गाडीची काच फोडत अधिकाऱ्यांना वाहनांमध्ये फिरण्याचा अधिकार नाही, असं म्हटलं आहे.

08 Sept, 05:15 (IST)

मेघालयमध्ये आज 29 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 

08 Sept, 04:58 (IST)

अंदमान निकोबार मध्ये आज 27 नवीन कोरोना प्रकरणं समोर आली आहेत.

 

08 Sept, 04:47 (IST)

महाराष्ट्रात आज 16,429 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 423 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 9,23,641 इतकी झाली आहे.

 

08 Sept, 03:57 (IST)

धारावीत आज 5 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2,824 इतकी झाली आहे.

08 Sept, 03:17 (IST)

हैदराबादः ग्रीन इंडियन चॅलेंज प्रोग्राम अंतर्गत खासदार जोगीनापल्ली संतोष कुमार यांच्या हस्ते अभिनेता प्रभासने, खाजीपल्ली रिझर्व फॉरेस्टचे 1650 एकर जंगल दत्तक घेतले. हा परिसर शहरी इको पार्क म्हणून विकसित केला जाईल, ज्याचा पाया अभिनेता, खासदार आणि वनमंत्री ए.इंद्रकरण रेड्डी यांनी आज घातला.

08 Sept, 03:14 (IST)

भाजपा आमदार रीता धीमान यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आज राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्या उपस्थित राहिल्या होत्या. आरडी धीमान, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य), हिमाचल प्रदेश यांनी याबाबत माहिती दिली.

08 Sept, 02:35 (IST)

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने अनुज केसवानी याला 5 दिवसांसाठी एनसीबी कोठडी सुनावली आहे.

08 Sept, 02:24 (IST)

पालघर मॉब लिंचिंग प्रकरण CBI कडे जाण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

08 Sept, 02:21 (IST)

ICICI बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ED कडून अटक करण्यात आली आहे.

08 Sept, 02:17 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाचे आणखी 5776 रुग्ण आढळून आले असून 89 जणांचा गेल्या 24 तासात बळी गेला आहे.

08 Sept, 01:58 (IST)

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 5773 रुग्ण आढळले तर 141 जणांचा बळी गेला आहे.

08 Sept, 01:30 (IST)

Demonstration Vehicle ची प्रात्यक्षिक चाचणी यशस्वी ठरल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी DRDO चे अभिनंदन केले आहे.

08 Sept, 01:12 (IST)

महाराष्ट्रात आणखी 179 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण तर 3 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे.

08 Sept, 01:07 (IST)

मणिपूर येथे कोरोनाचे आणखी 84 रुग्ण आढळले तर 194 जणांची गेल्या 24 तासात प्रकृती सुधारली आहे.

08 Sept, 24:48 (IST)

पुणे महापालिकेकडून  तीन खासगी चाचणी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे.

08 Sept, 24:31 (IST)

चंदीगढ येथे कोरोनाचे आणखी 232 रुग्ण आढळले तर 3 जणांचा बळी  गेला आहे.

08 Sept, 24:22 (IST)

1 जुलै ते 7 सप्टेंबरच्या कालावधीत जवळजवळ 39,741 भाविकांनी घेतले बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दर्शन घेतले आहे.

08 Sept, 24:18 (IST)

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती हिची उद्या सुद्धा NCB कडून चौकशी होणार आहे.

07 Sept, 23:53 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आणखी 2077 रुग्ण आढळले आहेत.

Read more


महाराष्ट्रामध्ये आजापासून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. तर सचिवालयाला यंदा विधिमंडळात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला त्यांचा कोरोना चाचणी आर टी पीसी आर टेस्टचा रिपोर्ट सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. आमदारांसह त्यांचे सचिव, पत्रकार आणि इतर सुरक्षा कर्मचार्‍यांनादेखील कोरोना टेस्ट बंधनकारक आहे.

मुंबई मध्ये आज सकाळपासून वीजंचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट पहायला मिळाला. सुमारे 4.30- 5 वाजल्यापासूनच मेघगर्जना होत होती. मात्र पाऊस तुरळक बरसला आहे. मागील 3 तासांत अंदाजे 40-70 मीमी पाऊस झाला आहे. मात्र वेधशाळेच्या अंदाजानुसार, कोकणात मुसळ्धार पाऊस बरसू शकतो.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात काल रात्री 23 हजारांपेक्षा अधिक रूग्ण समोर आले तर देशात हा आकडा 90 हजारांच्या पार गेल्याने जागतिक क्रमवारीमध्ये देखील अमेरिकेपाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement