CSK vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सचा चेन्नई सुपरकिंग्ज संघावर 10 धावांनी विजय; तिसऱ्या विजयासह KKR टॉप 4 मध्ये; 7 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
CSK vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात 10 धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना जिंकत KKR संघ टॉप 4 मध्ये पोहचला आहे.
हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने हाथरस जिल्हा, अलीगड रेंजमध्ये ADG आणि DIG स्तरीय 2 विशेष अधिकाऱ्यांची 7 दिवसांसाठी नियुक्ती केली आहे.
मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रणाकरिता नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. सामान्यांना आता किफायतशीर किंमतीत मास्क मिळणार आहेत व मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे. शासन मान्यतेनंतर सुधारित दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक, असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
झारखंड मध्ये आज 829 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1087 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या नव्या वाढीमुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 89,702 वर पोहचला आहे. त्यापैकी 79,176 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 9759 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान आतापर्यंत 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांचा मृतदेह शिमला (हमाचल प्रदेश) येथील निवास्थानी लटकलेल्या अवस्थेत मिळाला, अशी माहिती शिमल्याचे एसपी मोहीत चावला यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 14,578 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 355 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 14,80,489, इतकी झाली आहे. यात मृत्यू झालेल्या 39,072, डिस्चार्ज मिळालेल्या 11,96,441 आणि प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 2,44,527 जणांचाही समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचाराच्या निकषांमध्ये बदल केला आहे. नव्या नियमांनुसार कोरोना काळात मान्यताप्राप्त राष्ट्रीय / राज्य राजकीय पक्षांसाठी जास्तीत जास्त 30 स्टार प्रचारक, अपरिचित नोंदणीकृत राजकीय पक्षांसाठी 15 स्टार प्रचारक निवडता येतील, असे आयोगाने म्हटले आहे.
तामिळनाडू: चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने अमेरिकेच्या दोन पोस्टल पार्सलमधून नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट अंतर्गत सायकोट्रॉपिक ड्रग्स-अल्प्रझोलम, लोराझेपॅम, क्लोनाझॅपम आणि डायजेपमच्या 455 गोळ्या जप्त केल्या. मदुराई येथील फार्मा निर्यातदारास अटक
मायक्रो फायनान्स कंपन्या सर्वसामान्य कर्जदाराचा मानसिक-सामाजिक छळ करत आहेत, त्यांना हा अधिकार कुणी दिला? ह्या दंडेलशाहीवर सरकार अंकुश ठेवणार नसेल तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
पंजाबमध्ये आज दिवसभरात 852 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 33 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,20,860 इतकी झाली आहे. त्यापैकी 11,563 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 3,712जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरतीत सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतीय संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगांच्या क्षमता दर्शविण्याकरिता एअरइंडियाने स्वतःचे एक स्थान बनविले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम बनविला आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूमध्ये दिवसभरात 5,447 जणांना कोरना संक्रमन झाले आहे. आज दिवसभरात 5,524 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 67 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमधील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 6,35,855, इतकी झालीआहे, अशी माहिती तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या आयपीएलमधील दोन्ही संघ आपले तिसरे विजयी लक्ष्य ठेवणार आहेत.
रिया सुटली भाजपाची पाटी फुटली म्हणत काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती. एनसीबीने तिला मादक पदार्थांच्या सेवनाबाबत अटक केली होती. आजच दिला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
कस्टम अधिकाऱ्यांनी कोझिकोड विमानतळावरुन दोन प्रवाशांकडून तब्बल तब्बल 3.701 किलोग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे. पावडर रुपात असलेल्या सोन्याची किंमत 1.65 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पत्र लिहिले आहे. पूर्णिया येथे राजदचे माजी सचिव शक्ती मलिक यांच्या हत्येच्या चौकशीसाठी सीबीआय चौकशीची शिफारस करण्याची विनंती त्यांनी केली. त्यांच्या पत्रामध्ये असेही लिहिले आहे की, "नामनिर्देशन दाखल करण्यापूर्वी तुम्ही मला अटक करू शकता आणि चौकशीसाठी मला बोलवू शकता."
केरळचे उर्जामंत्री एमएम मणी यांनी फेसबुकवर फेसबुक पोस्ट लिहून माहिती दिली आहे. त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांना तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
संपूर्ण भारत देश कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात मोठी लढाई लढत असताना दुसरीकडे जम्मू-काश्मीर मध्ये दहशतवाद्यांसमोर एखाद्या चट्टानासारखे उभे असलेले भारतीय जवान दहशतवाद्यांशी (Terrorist Attack) लढत आहे. जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) येथील शोपियनच्या सुगन (Sugan) भागात झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दहशतवाद्यांचे या परिसरात छुपे हल्ले सुरु असून भारतीय जवानही त्यांना जशाच तसे उत्तर देत आहे. हे ऑपरेशन अजूनही सुरु असल्याचे भारतीय सैन्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांच्या जम्मू-काश्मीर मध्ये कुरघोडी करण्याचे प्रकार सुरुच असून भारतीय सैन्य ही देशाच्या रक्षणासाठी त्यांना धैर्याने तोंड देत आहेत.
तर दुसरीकडे देशात आतापर्यंत 56.6 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते आता 84.7% इतके झाले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर मुंबईमधील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 2,17,090 वर पोहोचली आहे. यामध्ये आतापर्यंतच्या 9,199 मृत्यूंचा व 1,81,485 बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या मुंबईमध्ये 23,976 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)