आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 862 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 1,21,027 वर पोहोचली आहे. आज 45 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 6,690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार केरळ येथे झालेल्या एअर इंडिया अपघाताबाबत शोध आणि बचाव कार्य आता पूर्ण झाले असून, सर्व जखमींना विविध रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एअर इंडिया दुबई हेल्पलाईन +97142079444 हा आहे.
केरळ विमान अपघाताचे वृत्त समलजे. धक्का बसला. अपघातात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली. अपघातात जखमी झालेल्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कोझिकोडे मधील एअर इंडियाच्या विमान अपघात प्रकरणी काही प्रवासी जखमी तर काही जण बेशुद्ध पडले असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याचे NDRF डीजी एसएन प्रधान यांनी म्हटले आहे.
कोझिकोडे येथील विमान अपघाताप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवाश्यांच्या नातेवाईकांनी 0495 - 2376901 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
केरळ: कोझिकोड येथे एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमान अपघाताप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तर NDRF ला लवकरात लवकर घटनास्थळी पोहचण्यासह बचाव कार्य करण्याची सुचना सुद्धा दिल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे.
दुबई ते कॅलिकटकडे जाणारे एअर इंडिया चे विमान क्रमांक IX 1344 धावपट्टीवरून घसरले. त्यानंतर आता दुबई येथील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून हेल्पलाईन क्रमांत जारी करण्यात आला आहे. तो पुढील प्रमाणे - 056 546 3903, 0543090572, 0543090572, 0543090575
अयोध्या राममंदिराच्या भूमीपूजनाचा (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) कार्यक्रम 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यथासांग पार पडला. या सोहळ्याचे राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी स्वागत केले आहे. मात्र MIM चे नेते ओवेसींनी (Owaisi)वादग्रस्त विधान केले होते. यावर सडकून टीका करत काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही. अर्थात यात नेहमीप्रमाणे असदुद्दीन ओवेसी हेच आघाडीवर आहेत, असं म्हणत शिवसेनेनं (Shivsena) ओवेसींचा सामनाच्या अग्रलेखातून (Saamna Editorial) खरपूस समाचार घेतला. 'बाबर जिंदा है। जिंदा रहेगा' असे ओवेसी यांनी राममंदिराच्या भूमीपूजनानंतर वक्तव्य केले होते.
दरम्यान मुंबईत मुसळधार पावसाने आज सकाळपासून थोडी विश्रांती घेतली असली तरीही पावसाची संततधार सुरुच आहे. गेल्या 12 तासात, मुंबईत व जवळपास मध्यम ठिकाणी पाऊस पडला. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. ठाणे आणि मुंबई येथे पिवळा इशारा देण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या (Coronavirus Positive Cases) 1,46,305, उपचार घेऊन रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्या 3,16,375 आणि मृत्यू झालेल्या 16,792 जणांचा समावेश आहे.