Road Accident Deaths in 5 Years: 5 वर्षात रस्ते अपघातात 7.77 लाख लोकांनी गमावला जीव; रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा अहवाल पहा
2018 ते 2022 पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'भारतातील रस्ते अपघात, 2022' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
Road Accident Deaths in 5 Years: गेल्या 5 वर्षात देशात रस्ते अपघातात(Road Accident) 7.77 लाख मृत्यू झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 1.08 लाख मृत्यू झाले आहेत. यानंतर तामिळनाडू 84 हजार मृत्यूंसह दुसऱ्या क्रमांकावर (Road Accident Death)आहे. तर महाराष्ट्र 66 हजार मृत्यूंसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जाहीर केलेल्या 2018 ते 2022 पर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'भारतातील रस्ते अपघात, 2022' हा अहवाल प्रसिद्ध(Road Accident Death in India) केला आहे.(Parliament Winter Session: अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासाठी काँग्रेस परिवाराने संविधान बदलले; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा)
त्यानुसार 2021 मध्ये देशात रस्ते अपघातात 1,53,972 मृत्यू झाले होते. 2022 मध्ये त्यात वाढ होऊन 1,68,491 मृत्यू झाले. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १२ डिसेंबर रोजी सांगितले होते की, जगातील रस्ते अपघातांबाबत सर्वात वाईट रेकॉर्ड आपला आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मी जातो. तेव्हा तेथे रस्ते अपघातांबद्दल चर्चा करताना मी माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो.
2022 मध्ये देशात 4.61 लाख रस्ते अपघात झाले. अहवालानुसार, 2022 मध्ये देशात एकूण 4,61,312 रस्ते अपघातांची नोंद झाली. त्यापैकी 1,55,781 (33.8%) प्राणघातक होते. या अपघातांमध्ये 1,68,491 लोकांचा मृत्यू झाला तर 4,43,366 लोक जखमी झाले. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये एकूण रस्ते अपघातात 11.9% ने वाढ झाली आहे. तर रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या 9.4% आणि जखमींची संख्या 15.3% ने वाढली आहे. 2022 मध्ये 33% अपघात राष्ट्रीय महामार्गांवर झाले. देशातील एकूण रस्त्यांच्या नेटवर्कपैकी फक्त 5% महामार्ग आहेत. परंतु 55% पेक्षा जास्त अपघात तिथेच होतात. ज्यामध्ये एकूण 60% पेक्षा जास्त मृत्यू झालेत. 2022 मध्ये, एकूण अपघातांपैकी 32.9% आणि एकूण मृत्यूंपैकी 36.2% राष्ट्रीय महामार्गांवर झाले.
लोकसभेत रस्ते अपघातांवरील चर्चेदरम्यान गडकरी म्हणाले की, स्वीडनने रस्ते अपघात शून्यावर आणले आहेत आणि इतर अनेक देशांनीही ते कमी केले आहेत. प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, जेव्हा मानवी वर्तन आणि समाजात बदल होईल आणि कायद्याचा आदर होईल तेव्हा भारतातील परिस्थिती बदलेल.