Coronavirus: पूर्व दिल्ली येथील बटालियन कॅम्प मधील 68 नव्या CRPF जवानांना कोरोनाची लागण
पूर्व दिल्लीत 68 नव्या CRPF जवानांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या तुकडीतील आतापर्यंत एकूण 122 जवान कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.
कोविड-19 (COVID-19) रुग्णांची भारतातील संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. यात सामान्य नागरिकांसह या नागरिकांसाठी तैनात असलेल्या पोलीस, जवानांना देखील कोरोनाची लागण होत आहे. पूर्व दिल्लीत 68 नव्या CRPF जवानांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या तुकडीतील आतापर्यंत एकूण 122 जवान कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. यात 1 जवान बरा झाला असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती CRPF ने दिली आहे.
पोलिस, जवानांना कोरोनाची लागण झपाट्याने होत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही माणसाच्या रुपात असलेले देव कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात आहेत. Lockdown: लॉकडाऊन कालावधी 2 आठवड्यांनी वाढविण्यात आला, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 35,365 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. यात उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आलेल्या 9064 जणांचाही समावेश आहे. तसेच देशभरातील कोरोना संक्रमित मृतांची एकूण संख्या 1152 झाली आहे.
देशभरात लागू असलेला लॉकडाऊन (Lockdown) आणखी 2 आठवड्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील, देशातील लॉकडाऊन 17 मे पर्यंत कायम राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.