Osmanabad Accident: दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात एसटी बस उलटली, 40 पेक्षा अधिक प्रवासी जखमी
मोबाइलवर बोलत बाइक चालवणाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या खाली उतरली आणि शेतामध्ये उलटल्याची माहिती समोर येत आहे.
उस्मानाबादमध्ये (Osmanabad) एसटी बसला अपघात झाल्याची घटना समोर आली पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. परंडा तालुक्यातील भांडगावमध्ये ही घटना घडली आहे. जखमी प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून (Osmanabad Police) सुरु आहे. भुम आगाराची एसटी बस क्रमांक MH20 BL 2805 ला अपघात झाला आहे. बार्शीवरून भुमच्या दिशेने जाणारी ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये उलटली. (हेही वाचा - Ratnagiri Accident: दोपोलीतील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती)
परंडा तालुक्यातील भांडगाव येथे ही घटना घडली. या अपघातामध्ये बसमधून प्रवास करणारे 40 ते 50 प्रवासी जखमी झालेत. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच, भांडगाव येथील स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या प्रवाशांना बसच्या बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे भुम ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.
मोबाइलवर बोलत बाइक चालवणाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या खाली उतरली आणि शेतामध्ये उलटल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या अपघातानंतर अनेक अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झालेल्या पहायला मिळत आहे.