कोरोना व्हायरस: राज्यात पुणे आणि मिरज येथे प्रत्येकी एक जण रुग्णालयात निरिक्षणाखाली; 4 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्रातील स्थानिक घडामोडी ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि ताज्या घडामोडींचे ठळक मुद्द्यांसह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.
कोरोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुणे आणि मिरज येथे प्रत्येकी एक जण रुग्णालयात निरिक्षणाखाली. आतापर्यंत 19 जणांना घरी सोडले. चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या जिल्ह्यांतील प्रवाशांची वैद्यकीय विचारपूस करण्यासाठी पाठपुरावा सुरु - आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुपूर्त केला आहे.
पोटात संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे तसेच त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे. सर गंगा राम हॉस्पिटलचे डॉ. डी. एस. राणा, अध्यक्ष (बोर्ड ऑफ मॅनेजमेंट) यांनी याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना 2 फेब्रुवारी 2020 रोजी रुग्णालयात दाखल केले गेले होते.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मी शेतकऱ्यांना दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे, ते पूर्णपणे माफ होणार असून त्याच्या सातबारावरून ही पीककर्ज काढून टाकलं जाणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
शरद पवार हे अजूनही तरुण आहेत असे सांगत आमदार रोहित पवार यांनी मविआ एकत्र लढली तर पवार साहेब पंतप्रधान होतील असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागा अशा सूचनाही रोहित पवार यांनी केल्या आहेत.
तारापूर येथील एमआयडीत भीषण आग लागली ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्लॉट नंबर टी-101 येथील हर्षल केमिकल कंपनीत ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
नवी मुंबईत आज आयोजित करण्यात आलेल्या महाविकासआघाडीच्या मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून महाविकासआघाडीचे बरेच दिग्गज नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्ली निवडणूक 2020 च्या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत घेतलेल्या सभेत मोदी सरकारवर सडकून टिका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मेक इन इंडिया'चा केवळ घोषणा केली मात्र प्रत्यक्षात एकही कारखान सुरु केला नाही असे सांगत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. तसचे इंडियन ऑईल, एअर इंडियापासून ते लाल किल्ला विकणारे मोदी सरकार भविष्यात ताजमहाल देखील विकू शकतात असा टोला देखील मोदी सरकारला लगावला.
मुंबई महापालिकेचे 2020 बजेट सादर होताच विरोधकांकडून जोरदार टिका होण्यास सुरुवात झाली. या अर्थसंकल्पात विशेष बदल करण्यात आले नसून ठाकरे सरकारने मुंबईकरांची घोर निराशा केली आहे अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार आशिष शेलार ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 2020 मध्ये मुंबई महापालिकेला धोक्याच्या आर्थिक स्थितीवर “आणून दाखवले” असे सांगत ठाकरे सरकारवर शेलारांनी निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील निवडणूक मेळाव्यात बोलताना राजधानी दिल्लीतील निवडणूक म्हणजे या दशकातील पहिली निवडणूक आहे. हा नव्या दशकाचा भारताचा असेल. आज घेतलेल्या निर्णयांवर भारताचा विकास अवलंबून असेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
जालना येथे एका प्रेमी युगुलाला मारहाण करणाऱ्या चार आरोपींची पोलीस कोठडी एक दिवसाने वाढविण्यात आली आहे. युगुल मारहाण प्रकरणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट निर्माण झाली होती.
नारायण राणे हे विदुषक आहेत. केवळ सत्तेसाठी पक्ष बदलणं आणि लाचारी स्वीकारणं, सत्तेसाठी लोटांगण घालणं हेच त्यांच काम आहे. ते स्वत: नॉनमॅट्रीक आहेत. ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना काय अनुभव होता. त्यांनाही मुंबई महापालिकेपासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. मात्र ते आता विसरले असतील, अशा शब्दात शिवसेना खासदार विनय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे हे राजकारणातील विदुषक असल्याचेही ते म्हणाले.
इयत्ता बारावीच्या आत्महत्या विद्यार्थ्याने वर्गातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथे घडली आहे. या विद्यार्थ्याने शाळेच्या वर्गातील फळ्यावर आपण नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचा संदेश लिहून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जवळपास एखाद्या देशाच्या अर्थसंकल्पाइतका मोठा असलेला आणि भारतातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 2020 आज पालिका सभागृहात सादर होत आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी मोठमोठ्या घोषणा आणि अश्वासनांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 2020 आज जाहीर झाला. या अर्थसंकल्पांमध्ये शाळेच्या प्रवेश व निकासद्वारांवर व ईयत्ता चौथी ते सातवी चे वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी महापालिकेने २० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
महाराष्ट्रीतील परीवहन विभागासाठी केंद्राकडून येणार भरघोस निधी. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट. या सदिच्छा भेटीत महाराष्ट्रातील विविध परीवहन प्रकल्पांवर चर्चा झाली. यातील काही प्रकल्पांना निधी देण्याचे मान्य केल्याची माहिती परब यांनी दिली आहे.
वर्धा येथील एका शिक्षिका महिलेला पेटवून दिल्यामुळे याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संपूर्ण देशातून केली जात आहे. वर्धा येथील घटनेच्या आरोपीला हैदराबाद सारखाच न्याय दिला पाहिजे, याकरिता सर्व पक्षीय नेत्यांनी निवेदनातून मागणी केली आहे.
शिक्षिकेला भररस्त्यात पेटवून दिल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पीडित तरूणीला न्याय मिळवून देण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली असून या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक (Delhi Legislative Assembly Election 2020) , त्यासाठी विविध राजकीय पक्षांचा सुरु असलेला प्रचार, प्रचारादरम्यान, विविध नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधाने यामुळे देशातील राजकीय हवा चांगलीच तापली आहे. हे कमी की काय म्हणून इतर राज्यांतील नेतेही त्यात भर टाकत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात दिल्ली विधानसभेचे फारसे पडसाद उमटत नसले तरी, महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत प्रचाराला गेल्याने तिथे कोणत्या प्रकारचा प्रचार करत आहेत याबाबतही उत्सुकता आहे. महाराष्ट्रातून दिल्ली येथे प्रचारासाठी गलेले भाजप नेते मतदारांना चिठ्ठ्या वाटण्याचे काम करत असल्याचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे ही उत्सुकता अधिक वाढली आहे.
वर्धा जिल्ह्यात हिंगणगाठ येथे एका महिलेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला. या प्रकरणाचेही तीव्र पडसाद उमटत असून, राज्य सरकार काय कारवाई करते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, यवतमाळ येथेली एका जागेसाठी होणाऱ्या विधानसभा निवडणूक 2020 चा आज निकाल लागणार आहे. त्यामुळे या जागेवरुन कोण बाजी मारतं याबाबत उत्सुकता आहे. इथे महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा सामना आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक अशी दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, जगभरात भीतीचे सावट पसरवणारा कोरोना व्हायरस, चीनमधील स्थिती तसेच जगभरात कोरोना व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी उचलली जाणारी पावले याबाबतही उत्सुकता आहे. भारतानेही कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार यंत्रणा कार्यन्वीत केली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक घडामोडी ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि ताज्या घडामोडींचे ठळक मुद्द्यांसह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)