48 Eggs at Rs 49! ऑनलाईन 49 रुपयांमध्ये 48 अंडी खरेदी करण्याची ऑफर; महिलेने गमावले 48 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर
महिलेने सांगितले की, तिने पेमेंट केले आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी तिला तिच्या बँक क्रेडिट कार्ड विभागातून कॉल आला. त्यानंतर महिलेने त्यांना फसवणुकीबद्दल सांगितले आणि त्यांनी महिलेचे खाते ब्लॉक केले. त्यानंतर महिलेने सायबर क्राईम हेल्पलाइन (1930) वर कॉल केला.
Bengaluru Cyber Crime: आजकाल आपण आपल्या अनेक कामांसाठी मोबाईल आणि इंटरनेटवर अवलंबून झालो आहोत. मोठ्या शहरांमध्ये दूध, ब्रेड, अंडी इत्यादी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू ऑनलाइन ऑर्डर करणे सामान्य आहे. म्हणूनच लोक बऱ्याचदा ऑनलाइन ऑफरच्या शोधात असतात जेणेकरून ऑनलाईन खरेदीवर थोडीफार सूट मिळू शकेल. मात्र अशावेळी अनेक लोक सायबर फसवणुकीलाही बळी पडतात. नुकतेच कर्नाटकमधील बेंगळुरूमध्ये एक महिला ऑनलाईन अंडी खरेदीवेळी सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीची शिकार ठरली. महिलेला एका ईमेलद्वारे अत्यंत कमी किमतीत अंडी खरेदी करण्याची ऑफर मिळाली होती.
चार डझन अंडी अवघ्या 49 रुपयांत खरेदी करण्याही ही ऑफर होती. या ऑफरवर महिलेने क्रेडिट कार्डने ऑनलाइन पेमेंट केले, तेव्हा तिला तिने 48 हजार रुपयांहून अधिक रक्कम भरल्याचा मेसेज आला.
रिपोर्टनुसार, वसंतनगर, बेंगळुरू येथे राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेने हाय ग्राउंड्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, तिला 17 फेब्रुवारीला एक ईमेल जाहिरात आली होती, ज्यामध्ये एक प्रसिद्ध कंपनी अत्यंत कमी किमतीत अंडी विकत असल्याचा दावा करण्यात आला होता. महिलेने सांगितले की, जाहिरातीत शॉपिंगची लिंक देण्यात आली होती. त्यावर क्लिक केल्यावर चिकन आणि अंडी यांच्याबद्दलच्या माहितीचे पेज उघडले. खाली स्क्रोल करताना, अनेक ऑफर दिसल्या ज्यात आठ डझन अंडी 99 रुपयांमध्ये कोणत्याही डिलिव्हरी शुल्काशिवाय वितरित करण्याचा दावा केला गेला होता.
महिलेने 49 रुपयांना चार डझन अंडी घेण्याचे ठरवले. ऑर्डर देण्यासाठी तिने पुढे क्लिक केले असता, संपर्क माहिती पेज उघडले. तिने सर्व तपशील प्रविष्ट केला आणि ऑर्डर देण्यासाठी क्लिक केले. त्यानंतर पुढील पान उघडले, ज्यामध्ये फक्त क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरण्याचा पर्याय होता. महिलेने सांगितले की, 'मी माझ्या क्रेडिट कार्डचे तपशील एक्सपायरी डेट आणि सीव्हीव्ही नंबर भरला आणि पेमेंटसाठी क्लिक केले आणि मला माझ्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी मिळाला. ओटीपी टाकण्यापूर्वी, माझ्या क्रेडिट कार्ड खात्यातून एकूण 48,199 रुपये डेबिट झाले आणि 'Shine Mobile HU' नावाच्या खात्यात हस्तांतरित केले गेले.' (हेही वाचा: US Cyberattack: अमेरिकेत मोठा सायबर हल्ला; देशभरातील फार्मसीमध्ये प्रिस्क्रिप्शन ऑर्डर्सला विलंब)
महिलेने पुढे सांगितले की, तिने पेमेंट केले आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी तिला तिच्या बँक क्रेडिट कार्ड विभागातून कॉल आला. त्यानंतर महिलेने त्यांना फसवणुकीबद्दल सांगितले आणि त्यांनी महिलेचे खाते ब्लॉक केले. त्यानंतर महिलेने सायबर क्राईम हेल्पलाइन (1930) वर कॉल केला. त्यांनी तिला जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची सूचना केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जर महिलेला क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी बँकेकडून कॉल आला नसता, तर बदमाशांनी आणखी पैसे उकळले असते. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यातून पैसे जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)