Jivitputrika Festival Accident: बिहारमध्ये मृत्यूचे तांडव; जीवितपुत्रिका उत्सवादरम्यान स्नान करताना 43 जणांचा बुडून मृत्यू, 3 बेपत्ता

पुढील शोध मोहीम सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Jivitputrika Festival Accident In Bihar: बिहार (Bihar) मध्ये 'जीवितपुत्रिका' उत्सवा (Jivitputrika Festival) दरम्यान झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 37 मुलांसह किमान 43 जणांचा बुडून मृत्यू झाला. तसेच आतापर्यंत तीन जण बेपत्ता झाले. राज्य सरकारने गुरुवारी सांगितले की, उत्सवादरम्यान भाविक राज्याच्या विविध भागात नद्या आणि तलावांमध्ये पवित्र स्नान करत असताना बुडण्याच्या घटना घडल्या आहेत.

बिहारमधील जीवितपुत्रिका उत्सव -

'जीवितपुत्रिका' हा बिहारमधील सर्वात मोठा सण आहे ज्यामध्ये स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास करतात आणि दोघेही नदी किंवा तलावात पवित्र स्नान करतात. बुधवारी झालेल्या उत्सवादरम्यान राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. (हेही वाचा -Mumbai Boys Drown: मुंबईत माहीमच्या समुद्रात 5 मुलं बुडाली, अग्निशमन दलाकडून शोध सुरु)

व्यवस्थापन विभागाने (डीएमडी) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आतापर्यंत एकूण 43 मृतदेह सापडले आहेत. पुढील शोध मोहीम सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सानुग्रह अनुदान प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत आठ मृतांच्या कुटुंबीयांना अनुदान देण्यात आले आहे. (हेही वाचा - Four People Drown In Jaipur Kanota Dam: पिकनिक गेले अन्...जयपूरच्या कानोटा धरणात बुडाले)

पूर्व आणि पश्चिम चंपारण, नालंदा, औरंगाबाद, कैमूर, बक्सर, सिवान, रोहतास, सारण, पाटणा, वैशाली, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, गोपालगंज आणि अरवाल जिल्ह्यांत जीवितपुत्रिका उत्सवादरम्यान बुडण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

औरंगाबादचे जिल्हा दंडाधिकारी श्रीकांत शास्त्री यांनी सांगितले की, पीडित महिला त्यांच्या कुटुंबीयांसह 'जीवितपुत्रिका' उत्सवानिमित्त तलावावर पवित्र स्नान करण्यासाठी गेल्या, त्यावेळी या दुर्घटना घडल्या. जीवितपुत्रिका उत्सवादरम्यान, महिला त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी उपवास करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif