मुंबईत पुढील 3 तासात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता ; 4 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या, लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसह जोडलेले रहा....

05 Jul, 05:12 (IST)

मुंबईत पुढील 3 तासात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.

05 Jul, 04:58 (IST)

पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसच्या नगरसेवक चंपा दास यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

05 Jul, 03:54 (IST)

जम्मू-काश्मीरच्या अरे, कुलगाम येथे पोलिस, सैन्य आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. अली भाई असे एका दहशतवाद्याचे नाव आहे. दुसर्‍या दहशतवाद्याची ओळख अजून पटली नाही. हे दोघेही हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते.

 

05 Jul, 03:34 (IST)

बिहारमधील 5 जिल्ह्यात वीज कोसळल्याने 20 जण ठार झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाणे याबाबत माहिती दिली.

05 Jul, 03:08 (IST)

मुंबईत आज 1180 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 68 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

05 Jul, 02:56 (IST)

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 295 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 7,074 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,00,064 वर पोहचली आहे.

 

05 Jul, 02:47 (IST)

जम्मू-काश्मीरमध्ये आज 227 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

05 Jul, 02:11 (IST)

गुजरात येथे गेल्या 24 तासात 712 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 21 जणांचा बळी गेला आहे.

05 Jul, 02:04 (IST)

मणिपूर येथे गेल्या 24 तासात आणखी 9 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 658 वर पोहचला आहे.

05 Jul, 01:53 (IST)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली COVID19 ची चाचणी केली आहे.

05 Jul, 01:51 (IST)

भारतात कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 60.81 टक्क्यांवर पोहचला आहे.

05 Jul, 01:38 (IST)

तेलंगणा येथे जवळजवळ 6 हजार नागरिक होम आयसोलेशन मध्ये असल्याची आरोग्य विभागाची माहिती  देण्यात आली आहे.

05 Jul, 01:19 (IST)

मुंबई, ठाणे येथे अतिमुसळधार पाऊस पुढील 24 तास कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

05 Jul, 01:06 (IST)

दिल्लीत आज 9,925 RT-PCR आणि 13,748 रॅपिड टेस्टिंगची प्रक्रिया पार पडली आहे.

05 Jul, 24:43 (IST)

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी वॉटर लॉगिंग झाले आहे.

05 Jul, 24:26 (IST)

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

05 Jul, 24:18 (IST)

तमिळनाडू येथे आज कोरोनाचे 4280 रुग्ण आढळून आले असून 65 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 1,07,001 वर पोहचला आहे.

05 Jul, 24:04 (IST)

मुंबईतील धारावीत आज कोरोनाचे आणखी 2 रुग्णांची भर पडल्याने आकडा 2311 वर पोहचला आहे.

04 Jul, 23:53 (IST)

ओडिशा सरकारकडून Kanwar Yatra ला कोविड19 मुळे परवानगी देण्यात आलेली नाही.

04 Jul, 23:34 (IST)

गोव्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्लाझ्मा बँकची सुविधा उपलब्ध होणार असल्याची आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माहिती दिली आहे.

Read more


आज महाराष्ट्रात बेंदूर सण साजरा केला जाणार आहे. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असणाऱ्या या सणानिमित्त बैलांना सजवून त्यांना गोडाधोडाचे जेवण दिले जाते. शेतात मदत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. दरम्यान कोरोना व्हायरस संकटामुळे सण अगदी साध्या स्वरुपात साजरा केला जाईल.

एकीकडे कोरोना व्हायरसचा उद्रेक देशासह राज्यात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 1,92,990 वर पोहचली असून त्यापैकी 104687 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 79911 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान राज्यात 8376 रुग्ण कोविड-19 च्या संसर्गामुळे दगावले आहेत. यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मुंबईकरांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई ही शहरं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आली आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

देशातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन वारंवार करण्यात येत आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या 6 लाखांच्या पार गेली असून 18 हजार हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने देशाचा रिकव्हरी रेट 60.73% वर पोहचला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now