मुंबईत DRI अधिका-यांनी 3 कोटी रुपयांचे हेरॉईन केले जप्त, तपास सुरु ; 4 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

05 Dec, 04:25 (IST)

मुंबईत 3 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. DRI अधिका-यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी तपास सुरु आहे.

05 Dec, 04:10 (IST)

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून उद्या यावर अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

 

05 Dec, 03:26 (IST)

कोविड19 नंतरच्या स्थितीतून पुन्हा एकदा शिकण्यासारखे आहे असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

05 Dec, 03:15 (IST)

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 4482 रुग्ण आढळले असून 20 जणांचा बळी गेला आहे.

05 Dec, 02:56 (IST)

Maharashtra MLC Election 2020  मध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे जयंत असगावकर विजयी झाले आहेत.

05 Dec, 02:44 (IST)

दिल्ली सरकारकडून अनस्किल्ड, सेमी स्किल्ड, स्किल्ड आणि अन्य कॅटेगरी मधील कामगारांच्या DA मध्ये वाढ करण्यात येणार असल्याचा  निर्णय घेतला आहे.

05 Dec, 02:37 (IST)

GHMC Election Results नंतर भाजप कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करत आतिषबाजी करण्यात येत आहे.

05 Dec, 02:15 (IST)

मुंबईत आज दिवसभरात 1025 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 2,59,137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत आज 813 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,84,502 वर पोहोचली आहे.

05 Dec, 01:18 (IST)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 6776 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 17 लाख 10 हजार 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर आज नवे 5229 कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 18 लाख 42 हजार 587 वर पोहोचली आहे.

05 Dec, 24:59 (IST)

मणिपूर मध्ये आज 273 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 22,445 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मणिपूर मध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 25,691 वर पोहोचली आहे.

05 Dec, 24:38 (IST)

पश्चिम बंगाल मध्ये दुचाकी चालकांसाठी येत्या 8 डिसेंबर 2020 ते 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत 'हेल्मेट नाही तर इंधन नाही' हा नियम लागू होणार आहे.

05 Dec, 24:12 (IST)

फ्रान्समधील विजय मल्ल्याची 1.6 मिलियन युरोची मालमत्ता ED ने जप्त केली आहे.

04 Dec, 23:59 (IST)

नवी दिल्लीत मागील 24 तासांत 4067 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 73 रुग्ण दगावले आहेत. यामुळे नवी दिल्लीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 86 हजार 125 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 9,497 वर पोहोचली आहे.

04 Dec, 23:33 (IST)

केरळात आज कोरोनाचे आणखी 5718 रुग्ण आढळले असून 5496 जणांची प्रकृती सुधारली आहे.

04 Dec, 23:21 (IST)

येत्या 8 डिसेंबरला एक भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. तर शेतीविषयक तीन बिलांच्या विरोधात शेतकऱ्यांकडून करण्यात येणार जोरदार आंदोलन करण्यात येत आहे.

04 Dec, 23:16 (IST)

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी हरिद्वारच्या हर की पौड़ी ला भेट दिली.

04 Dec, 23:07 (IST)

उत्तर प्रदेशात मागील 24 तासांत 1985 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 22, 665 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 7877 इतकी झाली आहे अशी माहिती अपर मुख्य सचिव स्वास्थ्य अमित मोहन प्रसाद यांनी दिली आहे.

04 Dec, 22:32 (IST)

Chennai International Airport वर 35.5 लाखाचे सोनं जप्त करण्यात आले आहे. तर एकाला अटक झाली आहे.

04 Dec, 21:57 (IST)

COVID19 Vaccination साठी दिल्ली सरकारकडून आरोग्य कर्मचार्‍यांच्या नाव नोंदणीला सुरूवात  झाली आहे. अनेक नर्सिंग होम आणि हॉस्पिटल, क्लिनिक्सचा HR data सादर होण्यास सुरूवात झाली आहे. सरकारकडून अन्य हेल्थ केअर फॅसिलिटी देणार्‍यांना नाव नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

04 Dec, 21:29 (IST)

Sri Guru Tegh Bahadur यांच्या 400 व्या जयंती निमित्त खास लोगोचं  मुख्यमंत्री Captain Amarinder Singh यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.

Read more


विधानपरिषदेच्या 6 जागांवर 1 डिसेंबर दिवशी निवडणूक झाल्यानंतर आता त्याचे निकाल स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान कालपासून सुरू झालेली मत मोजणी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आज पहाटेपर्यंत अनेक ठिकाणी मतमोजणीचं काम सुरू होते. दरम्यान निकालांचा कल पाहता भाजपाला हादरा बसण्याची शक्यता आहे. 4 ठिकाणी महाविकास आघाडी आणि एका जागेवर अपक्ष तर धुळे नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागी भाजपाला विजय मिळाला आहे.

भारतामध्ये कृषी कायद्याविरूद्ध शेतकरी मागील 8 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यावरून आता शेतकरी- सरकार मध्ये बोलणी सुरू झाली आहे. शिवसेनेने यावर सामना मधून टीका केली आहेत. हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणलं असं म्हणत शिवसेनेने केंद्रावर निशाणा साधला आहे. तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने काल घेतली आहे. मात्र, कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान ममता बॅनर्जी, अकाली दलाचे नेते लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत असे सांगितले आहे. तसेच काल जर केंद्राने कृषी कायदा रद्द केला नाही तर देशभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now