Jammu and Kashmir: हिज्बुल मुजाहिद्दीनशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. अवंतीपोरा पोलिसांनी सुरक्षा दलांसमवेत केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरु आहे अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
झारखंडे येथे आज 323 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 421 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची आकडा 1 लाख 1 हजार 287 वर पोहचला आहे. ट्विट-
महाराष्ट्रात आज 6 हजार 190 रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची सख्या 16 लाख 72 हजार 858 वर पोहचली आहे. राज्यात सध्या 1 लाख 25 हजार 418 रुग्णावर उपचार सुरु आहेत. ट्विट-
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सर्व स्टेज कॅरिज, मिनी आणि स्कूल बससाठी 31 डिसेंबरपर्यंत मोटार वाहन कर माफ करण्याचे आदेश दिले आहेत. ट्वीट-
राजस्थान रॉयल्सचे खेळाडू आज रात्री साडेसहा वाजता अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी टीम हॉटेलमधून रवाना झाले. ट्विट-
भारतामध्ये सध्या कांदा प्रश्न पेटला आहे. सर्वत्र कांद्याचे दर वाढले आहेत. देशात 7 हजार कांदा आयात केला आहे तर दिवाळी पूर्वी 25 हजार टन कांदा येणार आहे. अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली आहे.
गुजरात: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते Sardar Patel Zoological Park चं केवाडिया मध्ये उद्घाटन करण्यात आले त्यानंतर त्यांनी पार्कची सफारी देखील केली.
पुणे विमानतळावर दुबई वरून आलेल्या प्रवाशाकडून 7.89 लाखाच्या 151.82 ग्रामच्या सोन्याच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहे. या वस्तू बॅगेच्या हॅन्डलमध्ये रबरमध्ये गुंडाळून ठेवण्यात आल्या होत्या.
मुंबई पोलिसांच्या पाठीवर Bombay HC कडून कौतुकाची थाप देण्यात आली आहे. कोविड 19 च्या काळात दबाव आणि ताणाखाली पोलिस कर्मचारी चोख काम करत आहेत. त्यांना जनतेकडून सहकार्य मिळायला हवे.
एसटी कर्मचार्यांचे थकीत पगार देण्यासाठी कर्ज काढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान लॉकडाऊन मध्ये एसटीचं नुकसान झालं असून तोट्यात वाढ झाली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे.
हंडवारा येथील चिनार पार्क मध्ये तपासणी दरम्यान दहशतावादी संघटनेसोबत काम करत असल्याच्या आरोपाखाली दोन जणांना जम्मू कश्मीर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
भारतामध्ये आज शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा यांच्यासोबतच ईद-ए-मिलाद उन नबी चा सण देखील साजरा केला जात आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचं वातावरण आहे. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या आहेत. ईदचा सण समाजात एकात्मता, बंधुता वृद्धिंगत करायला मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शरद पौर्णिमेच्या निमित्ताने आज भारतामध्ये वाराणसी मध्ये भाविकांनी गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. गंगा घाट वर पुजा करण्यासाठीदेखील भाविक मंडळी जमली आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान भारतामध्ये कोरोनाचं संकट अजूनही कमी झालेलं नाही. मात्र नव्या रूग्णांचं निदान होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. देशामध्ये आता कोविड 19 टेस्टिंग लॅब आणि क्षमता वाढवल्या आहेत. दरम्यान आता 10.65 कोटी टेस्टिंग झाल्या आहे. दिलासादायक बाब म्हणजे टेस्टिंग वाढवलं तरीही नवे रूग्ण वाढीचा दर कमी आहे. भारताचा टेस्ट पॉझिटीव्हीचं प्रमाण आता 7.54% आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)