Lockdown: लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात एकूण 1 लाख 19 हजार 222 गुन्ह्यांची नोंद; तर, 23 हजार 533 जणांना अटक; 30 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

31 May, 04:58 (IST)

लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत कलम 188 अंतर्गत एकूण 1 लाख 19 हजार 222 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 23 हजार 533 जणांना अटक केली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ट्वीट- 

 

 

31 May, 03:50 (IST)

 

मुंबईत  आज 1 हजार 510 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 38 हजार 220 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

31 May, 02:56 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यात गेल्या काही वेळापासून सुरु असलेली बैठक संपली आहे. ही बैठक वर्षा बंगल्यावर सुरु होती. तसेच या बैठकीत कोरोना स्थिती आणि लॉकडाउनबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

31 May, 02:15 (IST)

उत्तराखंड येथे 22 आणखी कोरोनाबाधित आढळून आल्याने आकडा 749 वर पोहचला आहे.

31 May, 02:01 (IST)

महाराष्ट्रात आज नव्या 2940 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर 99 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 65,168 वर पोहचला असून एकूण 2197 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास थेट महापालिका आयुक्तांना कळवावे असे निर्देशन देण्यात आले आहे.

31 May, 01:51 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक सुरु झाली आहे. 

31 May, 01:46 (IST)

पश्चिम बंगाल येथे येत्या 15 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत.

31 May, 01:30 (IST)

BCCI  कडून रोहित शर्मा याच्या नावाची राजीव गांधी खेल रत्न पुस्कार 2020 साठी शिफारस करण्यात आली आहे.  तसेच इंशात शर्मा, शिखर धवन आणि दीप्ती शर्मा यांना अर्जुन अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे.

31 May, 01:16 (IST)

दिल्लीत आज कोरोनाचे नवे 1163 रुग्ण आढळून आल्याने आकडा 18549 वर पोहचला आहे.

31 May, 24:54 (IST)

येत्या 2 दिवसात विद्यापीठ परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री व तंत्रमंत्री  उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

31 May, 24:49 (IST)

आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, मेट्रो ट्रेन, सिनेमा हॉल्स, जिम, राजकीय मेळावे यासंदर्भात परिस्थितीचा आढवा घेऊन निर्णय घेणार-MHA

31 May, 24:44 (IST)

देशात रात्री 9 ते पहाटे 5 वाजल्यापर्यंत कर्फ्यू लागू राहणार- MHA

31 May, 24:41 (IST)

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाता सोबत सल्ला घेतल्यानंतर शाळा, महाविद्यालय, ट्रेनिंग, कोचिंग इन्स्टि्युट सुरु करण्यात येणार-MHA

31 May, 24:38 (IST)

शॉपिंग मॉल्स येत्या  8 जून पासून सुरु करण्यास परवानगी MHA यांच्याकडून देण्यात आली आहे.

31 May, 24:33 (IST)

येत्या 8 जून पासून धार्मिक स्थळ, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि अन्य सुविधा नागरिकांसाठी सुरु होणार असल्याचे MHA यांनी म्हटले आहे.

31 May, 24:31 (IST)

कंटेन्ट झोनमधील देशव्यापी लॉकडाउन 30 जून पर्यंत कायम  राहणार असल्याचे MHA  यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

31 May, 24:25 (IST)

#Unlock1: सरकारकडून कंन्टेंटमेंट झोन वगळता कोणती कामे सुरु होणार याबाबत  नव्या मार्गदर्शक तत्वांची घोषणा करण्यात आली आहे.

31 May, 24:12 (IST)

केरळात आज कोरोनाचे नवे 58 रुग्ण आढळून आल्याने आकडा 624 वर पोहचला आहे.

30 May, 23:57 (IST)

मध्य प्रदेशात येत्या 15 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

30 May, 23:38 (IST)

धारावीत आज आणखी 18 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने आकडा 1733 वर पोहचला आहे.

Read more


एकीकडे कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या भीषण विषाणूने संपूर्ण भारताला (India) आपल्या जाळ्यात अडकवले असून दुसरीकडे जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) च्या कुलगाम जिल्ह्यात दहशवादी आणि भारतीय सैन्यामध्ये जोरदार चकमक सुरु आहे. कुलगाम जिल्ह्यातील वानपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या सैन्यामध्ये जोरदार चकमक सुरु आहे. पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफची संयुक्त टीम ही कारवाई करत आहे. या चकमकीबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तर दुसरीकडे भारतात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,65,799 वर पोहचला आहे. आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सद्य घडीला 89987 कोरोना ऍक्टिव्ह प्रकरणे असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत 71105 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. दुर्दैवाने 4706 रुग्णांचा या विषाणूने जीव घेतला आहे. या आकडेवारीनुसार, भारताने चीन ला कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत मागे टाकले आहे. ज्या चीन मधून कोरोनाचा उद्रेक सुरु झाला तिथे आजवर कोरोनाचे 82 हजार 995 रुग्ण आढळले आहेत तर त्यातील 4 हजार 634 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात सध्या 1 लाख 65 हजार 799 रुग्ण असून मृतांचा आकडा 4706 इतका झाला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर महाराष्ट्रात एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 62,228 अशी झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी, 62 हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 35 हजार 467 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 976 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 116 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे विभाग- 58, नाशिक- 32, पुणे-16 या विभागात सर्वात जास्त मृत्यू आहेत. कोरोना विषाणू मुळे राज्यात आतापर्यंत 2098 मृत्यू झाले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now