आयपीएलच्या तेराव्या हंगामातील आजचा सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने कोलकाता नाईट राईडर्सवर 18 धावांनी विजय मिळवला आहे. ट्वीट-
भिवंडी येथील एका इलेक्ट्रॉनिक वस्तू साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमनदल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रांचीच्या सुखदेव नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. पोलिसांनी आयपीसी आणि पीओसीएसओ कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहे, असं रांचीचे एसपी सौरभ यांनी सांगितलं आहे.
हरियाणामध्ये 1,188 नवे कारोना संक्रमित रुग्ण सापडले असून 25 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय 1,542 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
मध्य प्रदेशातील हायकोर्टाच्या ग्वालियर खंडपीठाने निवडणूकीच्या रॅलीत 100 हून अधिक जण उपस्थितीत राहिलेल्या पक्षाच्या विरोधात FIR दाखल करण्याचे निर्देशन दिले आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) सुरक्षिततेच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अनेक उद्घाटन, बैठका या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतल्या. मात्र आज नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) रोहतंग (Rohtang) येथे अटल बोगद्याचे अनावरण करणार आहेत. त्यासाठी ते विमानाने चंडीगड़मध्ये (Chandigarh) दाखल झाले आहे. आज सकाळी 10 वाजता रोहतंग हा उद्घाटनचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशला लेह-लडाखशी जोडणाऱ्या रोहतंग बोगद्याला 'अटल बोगदा' नाव देण्यात आलंय. 10 हजार फूट उंचीवर स्थित हा जगातील सर्वात लांब बोगदा असून हा तयार करण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी लागला.
तर दुसरीकडे भारताभोवती कोरोना व्हायरसचा विळखा देखील घट्ट होत चालला आहे. मात्र यात दिलासादायक गोष्ट म्हणजे मागील आठवड्याभरात 25 राज्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर महाराष्ट्रात देखील काल 15,591 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून नवीन 13,294 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे एकूण 11,17,720 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 2,60,876 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 78.91% झाले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)