सोलापूर जिल्हा शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले यांना Global Teacher Award जाहीर झाल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले अभिनंदन ; 3 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
झारखंड मध्ये आज 233 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले 6 रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 9 हजार 771 वर पोहोचली असून मृतांची संख्या 977 वर पोहोचली आहे. तसेच आज 208 रुग्ण बरे झाले असून सद्य घडीला राज्यात 1926 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत आज दिवसभरात 764 रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 2,58,112 वर पोहोचली आहे. तर 878 नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 2,83,689 वर पोहोचली आहे.
राज्य सरकारने संसदेचे अधिवेशन दोन दिवस नव्हे तर दोन आठवडे बोलवावे अशी मागणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
State govt has called only a two-day Assembly session on Dec 14-15. We'd demanded it should goe on for 2 weeks. There is problem for farmers in Maharashtra & they're not being helped, crimes against women are rising: Devendra Fadnavis, Leader of Opposition in Maharashtra Assembly
पश्चिम बंगाल मध्ये RT-PCR साठी खासगी चाचणी केंद्रात 950 रुपये नागरिकांना मोजावे लागणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून जाहीर करण्यात आला आहे.
विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतचं आहे. अमरावती, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मराठवाडा मध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधील ही निवडणूक आहेत. आज उशिरा पर्यंत हा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. यासोबतच धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणूकीचा निकाल हाती लागणार आहे.
दरम्यान दक्षिण भारतामध्ये आता बुरेवी चक्रीवादळ धडकणार आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये या चक्रीवादळाचा धोका अधिकआहे. काल बुरेवी चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून पुढे सरकले. 3 डिसेंबरला मुन्नारकडे तर 4 डिसेंबरला कन्याकुमारी ते तमिळनाडूच्या दिशेने सरकण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतामध्ये सध्या शेतकर्यांचा मुद्दा देखील संघर्षाचा झाला आहे. दिल्ली हरियाणा सीमेवर केंद्र सरकराच्या कृषी कायद्याविरूद्ध आंदोलन करणार्यांना आता राजस्थानातील शेतकरी देखील सहभागी झाले आहेत. आज पुन्हा केंद्रीय कृषीमंत्र्यांना शेतकरी भेटणार आहेत. खेळाडू पाठोपाठ साहित्यिकांनी देखील किसान आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)