Bengaluru Horror: बेंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; 29 वर्षीय महिलेची हत्या, मृतदेहाचे 32 तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये (Watch Video)

29 वर्षांच्या महिलेची क्रूरपणे हत्या करण्यात आली असून तिच्या शरीर 32 तुकड्यांमध्ये कापून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सुमारे 15 दिवसांपूर्वी हा हत्येचा कट उघडकीस आला. पोलिसांना गुन्हेगाराच्या घरात रेफ्रिजरेटरमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले.

Bengaluru Murder Case (फोटो सौजन्य - X/@ians_india)

Bengaluru Murder Case: 2022 मध्ये दिल्लीतील श्रद्धा वालकर नावाच्या मुलीची हत्या (Murder of Shraddha Walkar) करून तिचे 36 तुकडे करून तिला मेहरौलीच्या जंगलात फेकून दिल्याच्या भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता अशीच एक घटना बेंगळुरू (Bengaluru) मध्येही समोर आली आहे. ही घटना बेंगळुरूमधील मल्लेश्वरममधील वायलीकवल पोलीस स्टेशन परिसरात घडली. 29 वर्षांच्या महिलेची क्रूरपणे हत्या (Murder) करण्यात आली असून तिच्या शरीर 32 तुकड्यांमध्ये कापून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सुमारे 15 दिवसांपूर्वी हा हत्येचा कट उघडकीस आला. पोलिसांना गुन्हेगाराच्या घरात रेफ्रिजरेटरमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाली हत्या -

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महालक्ष्मी असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेला चार वर्षांचा मुलगाही आहे. महिलेचा नवरा नेलमंगला येथे राहतो. तसेच मृत महिला ही वायलीकवळ येथे ती एकटीच राहत होती. मुलगा वडिलांसोबत राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. मारेकऱ्याने मृतदेहाचे तुकडे करून 165 लिटरच्या सिंगल डोअर फ्रीजमध्ये ठेवले. (हेही वाचा - Shraddha Walkar Murder Case: श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणात संशयितांचीचं नाही तर थेट महाराष्ट्र पोलिसांची होणार चौकशी, गृहमंत्री अमित शाहांचं वक्तव्य)

मृत तरुणीचे कुटुंबीय आल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला. ही घटना वायलीकावळ येथील विनायक नगरमध्ये घडली. गेल्या दोन दिवसांपासून घरातून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार ही तरुणी दुसऱ्या राज्यातील रहिवासी होती. पोलीस आजूबाजूच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. मृत तरुणी तीन महिन्यांपूर्वीच तेथे राहायला आली होती. (हेही वाचा - Shraddha Walkar Murder Case: 'फाशी झाली तरी हरकत नाही, स्वर्गात मिळेल हूर'; श्रद्धाच्या हत्येबाबत आफताबला पश्चाताप नाही, चौकशीदरम्यान केले धक्कादायक वक्तव्य)

खून झालेल्या मुलीची आई आणि बहीण घरी आल्यानंतर खुनाचा उलगडा झाला. गेल्या दोन दिवसांपासून घरातून दुर्गंधी येत होती, त्यानंतर आज इमारतीत राहणाऱ्या इतर लोकांनी घरातील सदस्यांना फोन करून याबाबत माहिती दिली. मध्य विभागाचे डीसीपी शेखर आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त सतीश यांनी घटनास्थळी तपास केला. प्राथमिक तपासात मृतदेहाचे 32 हून अधिक तुकडे झाल्याचे समोर आले आहे. ही तरुणी तीन महिन्यांपूर्वीच येथे भाड्याने आली होती. हे घर जयराम नावाच्या व्यक्तीचे आहे.

माध्यमांशी बोलताना अतिरिक्त पोलिस आयुक्त सतीश यांनी सांगितले की, 'वायलीकवळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1BHK प्लॅटमध्ये हा मृतदेह सापडला. मृतदेहाचे तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते. ही घटना 4-5 दिवसांपूर्वी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली आहे. उर्वरित तपास सुरू आहे. मृताची ओळख पटली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement