पुणे: कोरोना व्हायरस लॉकडाऊन ऑर्डरचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 आरोपी व 20-25 अज्ञातांंच्या विरुद्ध FIR दाखल; 29 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

देशातील रुग्ण संख्येत होणारी वाढ चिंता वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहेत. मन की बात या रेडिओ प्रोग्रॅम मधून आज सकाळी 11 वाजता ते देशवासियांना संबोधित करणार आहेत.

30 Mar, 05:25 (IST)

पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील चिखली पोलिस ठाण्यात कोरोनाव्हायरस लॉकडाऊन ऑर्डरचे उल्लंघन केल्याप्रकरणी 13 आरोपी आणि  20 ते 25 संशियत अज्ञातांच्या विरुद्ध FIR नोंदवण्यात आली आहे. 27 मार्च रोजी हे आरोपी चिखली येथील एका इमारतीच्या गच्चीवर नमाज पठणासाठी जमले होते.

 

30 Mar, 04:44 (IST)

पंजाब मधील अमृतसर येथे कोरोना व्हायरसच्या 62 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

30 Mar, 03:25 (IST)

महाराष्ट्र शासनाने राज्यभरात स्थलांतरित कामगार वर्गासाठी 262 मदत शिबिरांची स्थापना केली आहे . राज्यातील 70,399 स्थलांतरित कामगार / बेघर लोकांना अन्न मिळावे आणि राहायला जागा मिळावी यासाठी ही खास सोय करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे.

30 Mar, 03:01 (IST)

शाहीनबाग येथील एका दुकानाला आज रविवार 29 मार्च रोजी संध्याकाळी अचानक आग लागली आहे, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

30 Mar, 02:16 (IST)

Coronavirus: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली आहे.  तसेच 96 जणांची  कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु,  कोरोनामुळे 27 जणांचा बळी गेला आहे. आरोग्यमंत्रालयाकडून यांसदर्भात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

30 Mar, 02:07 (IST)

पुण्यात आणखी 4 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 28 वर पोहचला आहे. पुण्याचे महापौर मुरलिधर मोहळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

30 Mar, 01:39 (IST)

कोरोनामुळे झालेलं अर्थव्यवस्थेचं नुकसान पाहून जर्मनीतील हेसे राज्याचे अर्थमंत्री थॉमस शाफर यांची आत्महत्या केली आहे. थॉमस शाफर हे गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारख टोकोचं पाऊल उचललं आहे. आज शाफर यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला.  

 

30 Mar, 24:53 (IST)

कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दुर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी करण्यात आला आहे.  +912026127394 या नंबरवर नागरिक आपल्या शंकांचे निरसन करू शकतात. यासंदर्भात शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली आहे.

 

 

30 Mar, 24:45 (IST)

राज्यात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होणार नाही अशी माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला आहे. दुकानदार ग्राहकांना चढ्या भावाने माल खरेदी करत आहेत. मात्र, आज छगन भुजबळ यांनी खाद्यतेलाच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नसल्याचे सांगितले आहे. 

 

30 Mar, 24:27 (IST)

हरियाणामधील गुरुग्राम येथे भाजीपाल घेऊन जाणाऱ्या ट्रकने 5 जणांना चिरडले आहे. यात या पाच जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

29 Mar, 23:42 (IST)

केरळमध्ये आज 20 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 202 वर पोहचली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

 

29 Mar, 23:35 (IST)

जेव्हा मी आपल्याशी बोलत असतो तेव्हा माझ्यासोबत आपण सगळे जण आहात. माझ्यासोबत आपल्या महाविकास आघाडी सरकारमधील सगळे तिन्ही पक्ष आहेत, त्या पक्षांचे नेते आहेत. विरोधी पक्षनेत्यांसोबत सुद्धा माझी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे सुद्धा फोन करून सूचना देत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.

 

 

29 Mar, 22:57 (IST)

Lockdown In India: भारतीय रेल्वे लॉकडाऊन दरम्यान दुग्धजन्य पदार्थ, वैद्यकीय उपकरणे, औषधे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विशेष पार्सल रेल्वे गाड्या चालवणार आहे.

 

29 Mar, 22:27 (IST)

3 नव्या रुग्णांसह महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 196 वर गेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

29 Mar, 22:10 (IST)

बुलढाणा येथे 45 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

29 Mar, 21:18 (IST)

महाराष्ट्र राज्यात एकूण 34 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात कोरोना पॉझिव्हीट 155 रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची शहरानुसार संख्या:

मुंबई-14

पुणे- 15

नागपूर- 01

औरंगाबाद- 01

यवतमाळ- 03

29 Mar, 21:05 (IST)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घरात सुरक्षित रहा असा संदेश वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात येत आहे. त्यासाठी ते नेहमीच खास ट्रिक वापरतात. आताही त्यांनी चिमुकलीचा क्युट फोटो शेअर करत भावूक संदेश दिला आहे. मी जर आईच्या पोटात 9 महिने राहू शकते तर तुम्ही भारतमातेसाठी 21 दिवस घरात नाही राहू शकत का? घरात रहा, सुरक्षित रहा असा संदेश यातून देण्यात आला आहे.

29 Mar, 20:23 (IST)

कोरोना व्हायरसच्या संकटात कोटक महिंद्रा बँकेकडून 50 कोटींची मदत करण्यात येणार आहे. त्यापैकी 25 कोटी कोटक बँकेतून देण्यात येणार आहेत. तर उर्वरीत 25 कोटींची मदत कोटक बँकेचे डिरेक्टर उदय कोटक स्वतः करणार आहेत.

29 Mar, 19:50 (IST)

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे ही बाब खरी आहे. पण, यात समाधानाची बाब अशी की, उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यापुढे कदाचीत न्यूमोनिया रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्युमोनियाची लक्षणे दिसणारा कोणताही रुग्ण आला तरी त्याला हलक्यात न घेता त्याची रक्तचाचणी, एक्सरे काढा. निदान करुन उपचार करा, असा सल्लाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांना दिला.

29 Mar, 19:43 (IST)

राज्य सरकार आपली मदत करत असताना आपणही राज्य सरकारला मदत करा. कारणाशिवाय गर्दी करु नका. अन्य़था आपल्याला फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Read more


कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करु लागले आहे. भारत देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 900 च्या पार गेली असून महाराष्ट्र राज्यातही 181 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटाचा धोका टाळण्यासाठी देश यापूर्वीच लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र तरी देखील रुग्ण संख्येत होणारी वाढ चिंता वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहेत. 'मन की बात' या रेडिओ प्रोग्रॅम मधून आज सकाळी 11 वाजता ते देशवासियांना संबोधित करणार आहेत.

कोरोना व्हायरसच्या वाढता प्रभाव विचारात घेता जीवनावश्यक वस्तू वगळता सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. या गंभीर संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारही विविध उपाययोजना करत आहे. राज्यातील विविध ठिकाणी साफसफाई केली जात आहे. तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मेडिकल स्टोर्स, किराणा मालाची दुकाने 24 तास उघडी राहणार आहेत. विशेष म्हणजे बाहेर जाणे टाळावे याकरता किराणा माल ऑनलाईन ऑर्डर करण्याचे आवाहनही मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

विशेष म्हणजे या संकटावर मात करण्यासाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी विविध स्तरातून लोक पुढे सरसावले आहेत. नेते मंडळी, आमदार-खासदार यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटीज, क्रीडापटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्थांनी मदतीची जबाबदारी स्वीकारली आहे. विशेष म्हणजे सामाजिक भान जपत काही लोक स्वतःहून पुढे येत स्थलांतरीत कर्मचारी, गरजू यांच्यासह अगदी प्राण्यांची काळजी घेतनाही दिसत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now