उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत घेण्यात येणार असल्याने नागरिकांनी वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा अशी सुचना रेल्वेकडून देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजारात जबरदस्त घसरण झाली असून त्याचा फटका गुंतवणूकदारांना झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवण्याकडे वळत असल्याने पाकिस्तानात 1 तोळे सोन्याचे दर 95 हजारांवर पोहचले आहेत.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात हिंगणघाट इथे एका प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्यात आलं होतं. हैदराबादमध्ये आज अशाचं स्वरुपाची घटना घडली आहे. प्रेमाला नकार दिला म्हणून चिडून एका नराधमाने 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित मुलगी 50 टक्के भाजली आहे.
जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप आमदार आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा येथे असलेला हा कारखाना आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे.
चेन्नईतील माधवाराम परिसरातील तेलाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे.
दिल्ली मेट्रो स्टेशनवर आज काही युवकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनात घोषणा 'देश के गद्दारों को, गोली मारो...' सारख्या घोषणाही दिल्या. मेट्रो स्टेशनवर थांबत असताना सहा युवकांनी अशा स्वरुपाच्या घोषणा दिल्या. याप्रकरणी 6 जणांचा अटक करण्यात आली आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षयने पुन्हा एकदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका केली आहे. पहिल्यांदा केलेल्या उचिकेत काही मुद्दे नमूद करायचे बाकी राहिल्याने पुन्हा एकदा ही याचिका करत असल्याचे अक्षयने सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षपद भूषवत असताना सचिन अहिर यांनी पक्षाला मोठा धक्का दिला होता. विधानसभा निवडणुकांच्या आधीच 25 जुलै 2019 रोजी सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. .
दिल्ली हिंसाचारात प्रबोक्षक विधाने केल्याचा आरोप लगवण्यात आलेल्या भाजप खासदार परवेश वर्मा यांनी स्वतःचा एक महिन्याचा पगार हिंसाचारात प्राण गमावलेल्या पोलीस कॉन्स्टेबल व अन्य अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला देणार असल्याची घोषणा केली आहे.
पुण्यातील कासुर्डी टोलनाक्यावर 7 वर्षांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी बारामती सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. सामूहिक बलात्कार, अपहरण आणि जबरी चोरी प्रकरणी न्यायालयाने तिघा आरोपींना आजन्म कारावास ठोठावला आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी, 28 फेब्रुवारी रोजी मुंबई वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या हत्येप्रकरणी अहमद अली कुरेशी याला दोषी घोषित केले आहे. 23 ऑगस्ट 2016 रोजी खार येथे कुरेशी याच्याकडून शिंदेंची हत्या करण्यात आली होती हे सिद्ध होताच आज, शनिवारी या दोषींना जन्मठेप आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 29 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू होणार होता मात्र मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ उशिरा मिळणार आहे.या संदर्भात काही शासकीय निर्णय आज पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही मुंबई महापालिकेची पुढील सर्वसाधारण सभा 5 मार्च रोजी होणार आहे. त्यामुळं पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यास विलंब होऊ शकतो. अशातच काल महाविकाआघाडी सरकारने घेतलेला घेतलेल्या या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मनोज गाडेकर यांनी ही याचिका दाखल केली असुन केवळ काही नोकरदारांसाठीच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचा मनोज यांचा आरोप आहे. येत्या 2 मार्च ला दिवशी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे दिल्ली हिंसाचाऱ्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत सुद्धा 9 मार्च पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, दिल्ली मध्ये आता परिस्थिती स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर असली तरी काही ठिकाणी अजूनही तीव्र स्वरूपात हिंसाचार सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत तब्बल 42 जणांनी आपला प्राम गमावला आहे यामध्ये एका 60 वर्षीय वृद्धाचा देखेल काल मृत्यू झाल्याचे समजतेय.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारावर अजूनही मंदीचे सावट कायम आहे, चीन मध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार आणि त्यातून इतर देशात पोहचलेला संसर्ग हा मंदीचे मुख्य कारण म्ह्णून समोर येत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)