श्रीनगर येथील पांथा चौकात दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या नाक्यावर गोळीबार केला असता जवान व पोलिसांंनी परिसर घेरलाव शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार केला आणि त्यामुळे चकमक सुरु झाली अशी माहिती काश्मीर झोनल पोलिसांंनी दिली आहे.
केंद्राच्या अनलॉक 4 मार्गदर्शक सूचनांचा एक भाग म्हणून, कोची मेट्रो सेवा 7 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत 20 मिनिटांच्या अंतराने चालविली जाईल. ही सेवा कोरोना व्हायरस मानकांचे पूर्ण पालन करणार आहे. कोची मेट्रो रेल लिमिटेड (KMRL) ही माहिती दिली.
वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर इंडियाच्या मदतीने आजपर्यंत 3,86,080 अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यात आले आहे अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली आहे.
अनलॉक 4 नुसार मेट्रो सुरु करण्याचा निर्णय झाला आहे त्यापाठोपाठ आता भारतीय रेल्वेने लोकल गाड्या व लांंब पल्ल्याच्या रेल्वे सुद्धा लवकर सुरु कराव्यात अशी मागणी कॉंग्रेस नेते संंजय निरुपम यांंनी केली आहे. लॉकडाउन काळात जिथे कारखाने बंंद पडलेत, कामगार आपल्या गावी अडकलेत, बेरोजगारी वाढलीये तिथे कठोर निर्णय घेण्याची गरज आहे असेही निरुपम यांंनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.
भारत आणि रशियाचे संबंंध अगदी उत्तम आहेत, आजवर रशिया च्या आमंंत्रणानुसार भारताने विविध आंतरराष्ट्रीय परिषदेत हजेरी लावली आहे मात्र यंंदा कोरोनाच्या संंकटामुळे भारत आपला प्रतिनिधी Kavkaz 2020 या परिषदेसाठी पाठवणार नसल्याचे संंरक्षण मंंत्रालयाकडुन सांंगण्यात आले आहे.
गुजरात मधील वॉटर एरोड्रोम ऑपरेशनच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज गांधीनगर येथील न्यू सचिवालय येथे उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रकल्पाची सुरुवात 31 ऑक्टोबर ला होणार असुन एका तिकिटासाठी 4800 इतकी किंंमत असणार आहे. या समुद्री विमान सेवेतुन साबरमती रिव्हरफ्रंट, अहमदाबाद ते स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत सलग व परवडणारी हवाई सेवा उपलब्ध होणार आहे.
मुकेश अंबानी यांंनी फ्युचर समूहाच्या रिटेल व्यवसायाला 24,713 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचे समजत आहे. यानुसार ई-कॉमर्स व्यवसायात रिलायन्स ने मोठी स्पर्धा दुर केली आहे.
आज 29 ऑगस्ट रोजी मुंंबई शहरात 1432 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. यानुसार एकुण कोरोनाबाधितांंची संख्या 1,43,389 इतकी झालीआहे. मागील 24 तासात 682 रुग्ण कोरोनामुक्त झाले असुन आजवर 1,15,000जणांंनी कोरोनावर मात केली आहे. आज 31 जणांंचा कोरोनामुळे मृत्यु झाला असुन एकुण मृत्युंची संख्या 7593 इतकी झाली आहे. सध्या कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांंची संख्या 19,974 इतकी आहे.
पुणे शहरात नव्याने 1,968 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 92,839 झाली आहे. तर 1,657 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 15,423 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Unlock 4 Guidelines नुसार सामाजिक, शैक्षणिक, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांहस अन्य समारंभ फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडण्यास येत्या 21 सप्टेंबर पासून परवानगी देण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथील झाडोरा भागात काल रात्री पासून दहशतवादी आणि सुरक्षारक्षक यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. तर या चकमकीत गंभीररीत्या जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शोधमोहिम प्रगतीपथावर असल्याची माहिती श्रीनगरचे पीआरओ डिफेन्स यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान आज सकाळपासूनच मुंबईसह उपगनरांमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली. कालपासूनच मुसळधार पाऊस बसरत आहे. दरम्यान गेले काही दिवस दमदार पाऊस झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील जलसाठा वाढला आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीकपात मागे घेण्यात आली असून 29 ऑगस्ट पासून नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरसचा उद्रेक देशात सर्वत्र सुरुच आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 3387501 वर पोहचला आहे. तर मृतांची संख्या 61529 झाली आहे. सध्या देशात 742023 रुग्णांवर उपचार सुरु असून 2583948 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान संपूर्ण देशाला आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात नेमके काय सुरु होणार, काय बंद याबद्दल उत्सुकता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)