Coronavirus in India: भारतात 28,701 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितंची एकूण संख्या 8,78,254 वर

भारतात 12 जुलैपर्यंत 1 कोटी 18 लाख 06 हजार 256 कोविड-19 च्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात काल (12 जुलै) दिवसभरात 2,19,103 चाचण्या घेण्यात आल्या.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

भारतात (India) कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून गेल्या 24 तासांत 28,701 रुग्ण आढळले असून 500 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. यामुळे देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 8,78,254 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 23,174 वर पोहोचली आहे. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत 18,850 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 5 लाख 53 हजार 471 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सद्य घडीला 3,01,609 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये स्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. भारतात 12 जुलैपर्यंत 1 कोटी 18 लाख 06 हजार 256 कोविड-19 च्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात काल (12 जुलै) दिवसभरात 2,19,103 चाचण्या घेण्यात आल्या. हेदेखील वाचा- देशात आज दिवसभरात तब्बल 5 लाखांहून अधिक COVID19 च्या रुग्णांची प्रकृती सुधारली, रिकव्हरी रेट 62.78% वर पोहचल्याची आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती

देशातील कोरोनाबाधितांसदर्भातील रिकव्हरी रेट 62.78 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारताच्या ड्रग रेग्युलेटर संस्थेकडून म्हणजेच Drugs Controller General of India कडून आता कोविड 19 रूग्णांवर Itolizumab इंजेक्शन देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र हे इंजेक्शन केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्येच मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या कोरोना बाधित रूग्णांना श्वसनास त्रास होत असल्यास परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती अधिकार्‍यांनी PTI या वृत्तसंस्थेला दिली आहे. दरम्यान Itolizumab हे औषध Biocon कंपनीचे असून 'सोयरारिस' (psoriasis) या त्वचाविकाराच्या रूग्णांना दिले जाते.