मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन रजेवर असल्याने मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले. त्यांच्या स्वत:च्या कर्तव्यांव्यतिरिक्त त्यांची नेमणूकही केली: राष्ट्रपती भवन
नव्या भाडेकरूचा भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये सामान हलविण्यावर बंदी आणि सोसायटीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र मागितल्याबद्दल पुण्यातील एका गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात आज नव्याने दोन कोरोना विषाणू बाधीत रूग्ण आढळून आले आहेत जिल्ह्यात एकुण बाधीत रूग्णांची संख्या ३६७ झाली आहे. तर ४ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात एकुण २७९ रूग्ण बरे झाले आहेत.
मणिपूर येथे लॉकडाऊन आणखी 15 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 15 जुलै पर्यंत कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी म्हटले आहे.
अकोला जेल मध्ये 68 कैद्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान आयसोलेशन वॉर्डची सुविधा जेलमध्येच करण्यात आली असून कोरोनाग्रस्त कैद्यांची काळजी घेण्याासाठी इतरही सुविधा जेलमध्ये आहेत. अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात या रेडिओ प्रोग्रॅममधून जनतेशी संवाद साधणार आहेत. मन की बात या कार्यक्रमाचा आज 66 वा एपिसोड पार पडणार आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यांनी देश अनलॉक व्हायला सुरुवात झाली. अनलॉक 1.0 सुरु झाल्यानंतरचा मन की बात चा हा पहिला एपिसोड आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार, याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे.
7 जून पासून सातत्याने वाढत असणारे पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिरावले आहेत. आज दिल्लीत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही. दिल्लीत आज पेट्रोल 80.38 रु. प्रति लीटर आणि डिझेल 80.40 रु. प्रति लीटरने मिळत आहे. इंधनाचे दर स्थिरावल्यामुळे नक्कीच सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान कोरोना व्हायरसचे जागतिक आरोग्य संकट जगासह देशात कायम आहे. भारतात कोरोना बाधितांचा आकडा 5 लाखांच्या पार गेला असून त्यात दिवसागणित मोठी भर पडत आहे. अमेरिकेत कोविड-19 चा उद्रेक पाहायला मिळत आहे. अमेरिकेत 25,00,419 कोरोना बाधित रुग्णांसह 1,25,000 रुग्णांचा बळी गेल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या हवाल्याने AFP न्यूज एजेंन्सीने दिली आहे.