NIA कोर्टाने आज केरळ गोल्ड तस्करी प्रकरणातील फरार आरोपी Rabins Hame ला 7 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली; 27 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

28 Oct, 05:12 (IST)

विशेष राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (NIA) कोर्टाने आज केरळ गोल्ड तस्करी प्रकरणातील फरार आरोपी रबिन्स हमीदला 7 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. इंटरपोलने त्याच्याविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केल्या नंतर युएई सरकारने त्याला हद्दपार केले होते आणि कोची विमानतळावर अटक केली होती.

28 Oct, 04:53 (IST)

मणिपूरमध्ये आज 180 नवे कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली. सध्या मणिपूरमध्ये 4,246 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

28 Oct, 04:35 (IST)

पंजाबमध्ये आज 353 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 463 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

28 Oct, 04:11 (IST)

गुजरातमध्ये आज कोरोना विषाणूच्या 992 रुग्णांची, 5 मृत्यूंची नोंद झाली आहे.  आज राज्कोयातून 1,238 रुग्णांना सोडण्यात आले आहे. एकूण प्रकरणांची संख्या 1,69,073 वर पोहोचली आहे. सध्या राज्यामध्ये फक्त 13,487 सक्रीय रुग्ण आहेत.

28 Oct, 03:50 (IST)

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री (एमएसएमई) नितीन गडकरी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वॉलमार्ट वृध्दी डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले.

28 Oct, 03:08 (IST)

ओडिशा: कोरापुट विभागातील दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यास, 1,75,000 रुपयांची लाच मागणे ती स्वीकारल्याबद्दल अटक केली आहे.

28 Oct, 02:45 (IST)

Bihar Elections: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पाटणा येथे निवडणूक सभा घेणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे.

28 Oct, 02:16 (IST)

मुंबईत कोरोनाचे आणखी 801 रुग्ण आढळले असून 23 जणांचा बळी गेला आहे.

28 Oct, 01:56 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आणखी 4853 रुग्ण आढळले असून 44 जणांचा गेल्या 24 तासात बळी गेला आहे.

28 Oct, 01:50 (IST)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Green Delhi अॅपचे  लॉन्चिंग करणार आहेत.

28 Oct, 01:28 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 5363 रुग्ण आढळले असून 115 जणांचा बळी गेला आहे.

28 Oct, 01:18 (IST)

भारताचा ग्रोथ या वर्षात निगेटिव्ह किंवा शुन्याच्या जवळ असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी विधान केले आहे.

28 Oct, 24:58 (IST)

मध्य प्रदेशात कोरोनाचे आणखी 514 रुग्ण आढळले असून 8 जणांचा बळी गेला आहे.

28 Oct, 24:35 (IST)

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सुशांतची बहिण प्रियंका आणि मितू सिंह यांची याचिका बॉम्बे हायकोर्टाने फेटाळून लावण्याची विनंती केली आहे.

28 Oct, 24:08 (IST)

चंद्रपूर जिल्ह्यात नरभक्षी वाघाकडून गेल्या 21 महिन्यात आठ लोकांना ठार मारले आहे.

27 Oct, 23:47 (IST)

भोपाळ येथे राणी पद्मावती याच्या स्मारकाची उभारणी करण्यात येणार असल्याची मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे.

27 Oct, 23:27 (IST)

भारतीय सैन्य दलाचे चीफ जनरल मनोज नरवणे येत्या 4-6 नोव्हेंबरला नेपाळच्या दौरा करणार आहेत.

27 Oct, 23:25 (IST)

उत्तर प्रदेशात दारुची दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

27 Oct, 23:18 (IST)

CERA Week च्या चौथ्या वार्षिक भारत ऊर्जा मंचात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, यावर्षी भारताची वाढ नकारात्मक किंवा शून्याच्या जवळपास असेल.

27 Oct, 22:53 (IST)

DBT च्या माध्यमातून गरिबांना सरकारच्या योजनांमधून 100 टक्के लाभ मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले  आहे.

Read more


महाराष्ट्राच्या नागपूर भागात आज सकाळी सुमारे 3.3 रिश्टल सकेलचा भूकंप झाला आहे. हा भूकंप 4 वाजून 10 मिनिटांनी झाला असून नागपूरच्या नॉर्थ नॉर्थ ईस्ट भागात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कमी होत असलेली कोरोनाबाधितांची संख्या आता दिलासादायक बाब आहे. दरम्यान मुंबईत आज पासून मुंबई लोकलमध्ये वकील आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी कोर्टात काम करणार्‍या लिपिकांनाही मुंबई लोकल प्रवासाची मुभा आहे. अजूनही सार्‍यांसाठी मुंबई लोकल सुरू केलेली नाही.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दिल्लीमध्ये आज Infantry Day च्या निमित्ताने सीडीएस जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख मुकुंद नरावणे यांनी National War Memorial वर जाऊन शहीदांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now