आसाममध्ये पोलिस अधीक्षक (एसपी) दर्जाचे अधिकारी आणि अन्य 30 अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह ; 27 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई, पुणे सह देशा-परदेशातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीला नक्की भेट द्या.

28 Jun, 05:31 (IST)

आसाममध्ये पोलिस अधीक्षक (एसपी) दर्जाचे अधिकारी आणि अन्य 30 अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

28 Jun, 05:25 (IST)

केरळ पोलिसांकडून ऑनलाईन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी 47 जणांना अटक केली असून 140 इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत.

 

28 Jun, 05:06 (IST)

आसाममध्ये पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. पूरामुळे आज आणखी 2 जणांचा मृत्यू झाला असून 4.6 लाख लोक प्रभावित झाले आहेत.

 

28 Jun, 05:01 (IST)

छत्तीसगढमध्ये आज 57 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.

 

28 Jun, 04:27 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय आरोग्य पथकासोबत बैठक घेऊन राज्याच्या कोरोनाबाबत प्रतिसादाचा आढावा घेतला. तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी चर्चा केली.

28 Jun, 04:17 (IST)

मुंबईत 28 जूनपासून केश कर्तनालय आणि सलून दुकानं सुरू होणार आहेत.


 

28 Jun, 03:50 (IST)

पुणे शहरात आज नव्याने ८२२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात नायडू-महापालिका रुग्णालये ५६१, खासगी २५२ आणि ससूनमधील ०९ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या ८२२ रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या आता १५ हजार ६०२ इतकी झाली आहे.

28 Jun, 03:38 (IST)

गोव्यात एका दिवसात सर्वाधिक 89 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,128 वर पोहचली आहे. अधिकाऱ्यांनी आज माहिती जाहीर केली.

28 Jun, 03:31 (IST)

हरियाणाच्या रोहतकला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.4 इतकी नोंदविण्यात आली आहे. रात्री 9.11 वाजता रोहतकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

28 Jun, 03:21 (IST)

मोदीजी आणि अमित शाह यांचे पाहुणे आले होते... त्यांनी मला प्रश्न विचारले, मी उत्तर दिले आणि ते परत गेले आहेत:एनफोर्समेंट डायरेक्टरेटच्या (ईडी) चौकशीवर कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांची प्रतिक्रिया

28 Jun, 03:01 (IST)

पश्चिम बंगालमध्ये आज 521 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

28 Jun, 02:15 (IST)

मुंबईत 1460 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 41 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहरातील COVID19 चा आकडा 73,747 वर पोहचला आहे.

28 Jun, 02:04 (IST)

गुजरात येथे गेल्या 24 तासात नव्या 615 कोरोनाबाधितांची नोंद तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

28 Jun, 01:57 (IST)

कर्नाटक येथे आणखी 918 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 11 जणांचा बळी गेला आहे.

28 Jun, 01:31 (IST)

महाराष्ट्रात आणखी 5318 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 167 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा  1,59,133 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

28 Jun, 01:27 (IST)

जम्मू-कश्मीर येथे आणखी 204 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 6966 वर पोहचला आहे.

28 Jun, 01:16 (IST)

पाँडेचरी येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण  झाली आहे.

28 Jun, 24:42 (IST)

दिल्लीत आज नव्याने 2948 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 66 जणांचा बळी गेला आहे.

28 Jun, 24:37 (IST)

उत्तराखंड येथे आणखी 66  कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 2791 वर पोहचला आहे.

28 Jun, 24:24 (IST)

पंजाब येथे आणखी 100 कोरोनाबाधित रुग्णांची भर तर 7 जणांचा बळी गेला आहे.

Read more


आज सलग 21 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमतीत वाढ झाली आहे. नवी दिल्लीत (Navi Delhi) पेट्रोलच्या किंमतीत 0.25 पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या किंमतीत 0.21 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर 80.38 रुपये प्रति लीटर असून डिझेलचे दर 80.40 रुपये इतके आहेत. दिल्ली प्रमाणेच मुंबई,लखनउ, कोलकाता,चेन्नई या शहरात सुद्धा इंंधनाचे दर वधारले आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे गाडी भाडे वाढल्याने दुसरीकडे भाज्या,फळे यांचे दर सुद्धा वाढलेले पाहायला मिळतायत. आजचे पेट्रोल-डिझेल चे वाढलेले दर शहरानुसार सविस्तर जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

भारतात (India) काल (26 जून) दिवसभरात 18,552 रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 08 हजार 953 इतकी झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 384 नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांचा आकडा 15,685 वर पोहोचला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. देशात काल 10,244 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 2,95,881 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे..

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सध्या पश्चिम बंगाल आणि झारखंड या दोन राज्यात लॉकडाउन 31 जुलै पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या बाबत मात्र अशी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now