गोवा येथे गुन्हे शाखेकडून 85 ग्रॅमचे MDMA जप्त करत तीन जणांना अटक ; 27 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या, लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा...

28 Dec, 05:28 (IST)

गोवा येथे गुन्हे शाखेकडून 85 ग्रॅमचे MDMA जप्त करत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

28 Dec, 05:11 (IST)

गोवा येथे लॉकडाऊनमुळे पर्यटनावर परिणाम होणार असल्याच्या खोट्या WhatsApp मेसेजवर विश्वास ठेवू नका असे आवाहन बंदरं मंत्री मायकल लोबो यांनी केले आहे.

28 Dec, 04:59 (IST)

दिल्लीत कोरोनाचे आणखी 757  रुग्ण आढळले असून आणखी 16 जणांचा बळी गेला आहे.

28 Dec, 04:44 (IST)

युके येथून आंध्र प्रदेशात आलेल्या चार जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह  आली आहे.

28 Dec, 04:31 (IST)

आसाम येथे कोरोनाचे आणखी 103 रुग्ण आढळून आले असून 165 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे.

28 Dec, 04:14 (IST)

Atal Tunnel च्या माध्यमातून 5450 वाहनांनी प्रवास केला आहे.

28 Dec, 04:04 (IST)

बिहार मध्ये पब्लिक सर्विस कमिशनच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याने विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले गेले.

28 Dec, 03:53 (IST)

नागपूर येथे आज 240 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-

 

28 Dec, 03:35 (IST)

युकेहून परतलेल्या 1 हजार 438 जणांपैकी 13 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती तमिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजयबास्कर यांनी दिली आहे. ट्विट-

 

28 Dec, 02:45 (IST)

कतार येथील भारतीय नागरिकांसोबत एस जयशंकर यांनी वर्च्युअली बातचीत केली आहे.

28 Dec, 02:35 (IST)

गुजरात मधील अहमदाबाद येथील नाट्यगृहे तब्बल 10 महिन्यानंतर प्रेक्षकांसाठी खुली  करण्यात आले आहे.

28 Dec, 02:22 (IST)

कॉंग्रेस नेते राहुल गांधी वैयक्तिक भेटीसाठी परदेशात रवाना झाले असल्याचं पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे.

28 Dec, 02:12 (IST)

ब्रिटनमधून आलेले तेलंगणामधील दोन प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

28 Dec, 01:48 (IST)

जर्मनीमध्ये आज 13,755 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली.

 

28 Dec, 01:31 (IST)

जम्मू-काश्मीरच्या कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिरात आज हिमवृष्टी झाली.

28 Dec, 01:20 (IST)

कर्नाटकमध्ये आज 911 नवे कारोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच  11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 1,214 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

28 Dec, 01:13 (IST)

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक सूचक ट्विट केलं आहे. यात त्यांनी 'आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया,' असं ट्विट केलं आहे.

28 Dec, 24:53 (IST)

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

28 Dec, 24:27 (IST)

महाराष्ट्रात आज 3,314 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 2,124 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

 

28 Dec, 24:25 (IST)

शेती संदर्भातील कायदे रद्द करण्यासाठी मी केंद्राकडे हात जोडून आवाहन करतो, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंहू सिमेवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं आहे.

 

Read more


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. 2020 मधील हा शेवटचा प्रोग्रॅम असणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लेटेस्ट घडामोडी, समस्या यासंदर्भात जनतेशी संवाद साधतात. सध्या देशात सुरु असलेले शेतकरी आंदोलन, कोरोना व्हायरस लस, कोविड-19 नवा स्ट्रेन या बद्दल मोदी बोलण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज मोदी नेमकं कोणत्या विषयावर भाष्य करणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.

गोंदिया पोलिस आणि नक्षलविरोधी पथकाने काल संयुक्त कारवाईत दरेक्षे घाटाजवळील नक्षल लपण्याच्या ठिकाणाला सापळा लावला आणि 27 इलेक्ट्रिक डिटोनेटर्ससह स्फोटके जप्त केली.

देशात कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा धोका आहे. त्यामुळेच संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. ख्रिसमस आणि नववर्षाच्या तोंडावर महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

देशासह राज्यात थंडीची लाट पसरली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पारा घसरला असून नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आज मुंबईत आकाश काही अंशी ढगाळ राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now