कोरोनावरील लस Covaxin च्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला AIIMS मध्ये सुरुवात ; 26 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सह जोडलेले रहा...

27 Nov, 05:18 (IST)

कोरोनावरील लस Covaxin च्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला AIIMS मध्ये सुरुवात झाली आहे.

27 Nov, 04:58 (IST)

Cyclone Nivar च्या पार्श्वभुमीवर बंगळरुसह अन्य जिल्ह्यात 26 आणि 27 नोव्हेंबरसाठी Yellow अलर्ट जाहीर करण्यात आल्याची माहिती IMD कडून देण्यात आली आहे.

27 Nov, 04:30 (IST)

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान येथून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी करावी लागणार आहे.

27 Nov, 04:26 (IST)

मुंबईत कोरोनाचे आणखी 1147 रुग्ण आढळले असून 16 जणांचा बळी गेला आहे.

27 Nov, 04:04 (IST)

आजपर्यंत 80 टक्के वीज कनेक्शन पुनर्संचयित केले जाईल. Nivar Cylone मुळे वीज मंडळाला दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पी. थंगामणि, तामिळनाडूचे विद्युतमंत्री यांनी ही माहिती दिली.

27 Nov, 03:41 (IST)

Money Laundering Case मध्ये Cox and Kings चे प्रमोटर्स पीटर केरकर यांना ED कडून अटक करण्यात आली आहे.

27 Nov, 03:32 (IST)

तेलंगणा येथे कोरोनाचे आणखी 862 रुग्ण आढळल्याने आकडा 2,66,904 वर पोहचला आहे.

27 Nov, 03:10 (IST)

महाराष्ट्रातील वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना ऑक्टोंबर ते डिसेंबर महिन्यांसाठी प्रति महिना 5 हजार रुपये दिले जाणार आहेत.

27 Nov, 02:46 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाचे आणखी 1464 रुग्ण आढळले असून 14 जणांचा बळी गेला आहे.

27 Nov, 02:35 (IST)

जम्मू-कश्मीर मध्ये LOC वर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक ज्युनिअर कमिशनर ऑफिसर शहीद झाले आहेत.

27 Nov, 02:32 (IST)

नवी मुंबई आयुक्तांनी काही चाचणी प्रयोगशाळांद्वारे बनावट कोरोना नकारात्मक अहवाल दिले गेल्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

27 Nov, 02:06 (IST)

मुंबई: खासगी कंपनी टॉप सिक्युरिटीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अमित चंदोले यांना 29 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कस्टडीमध्ये पाठविण्यात आले आहे.

27 Nov, 01:21 (IST)

Nivar Cyclone: कुडलोरमध्ये उभारलेल्या छावण्यांमध्ये सुमारे 52,000 लोक राहिले आहेत. जिल्ह्यात एकूण 77 इलेक्ट्रिक पोल कोलमडले होते. 1500 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. सध्या सरकारकडून नुकसानीचे आकलन करून त्यानुसार निधी जाहीर केला जाणार आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली.  

27 Nov, 01:18 (IST)

राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 6,406 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 4,815 रुग्ण बरे झाले असून, 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 18,02,365 झाली असून, 16,68,538 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 85,963 सक्रीय रुग्ण आहेत व आतापर्यंत 46,813 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

27 Nov, 24:35 (IST)

दुसर्‍या खटल्यात अडकल्यामुळे क्षितिज रविप्रसाद आज तुरुंगातून बाहेर पडू शकत नाही. या प्रकरणी पुढील आठवड्यात 3 डिसेंबर रोजी सुनावणी होईल. वकील सतीश मनेशंडे यांनी याबाबत माहिती दिली.

27 Nov, 24:16 (IST)

भारताची Renewable Power Capacity ही जगातील चौथी मोठी आहे, जी 2022 पर्यंत 220 जीडब्ल्यू होईल. मागील दशकात Renewable Energy Sector मध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यावरून दिसून येत आहे की, गुंतवणूकीसाठी भारत हा पसंतीचा देश आहे. पंतप्रधान मोदी यांनी याबाबत माहिती दिली.

26 Nov, 23:33 (IST)

आरजेडी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना Kelly Bungalow येथून राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) येथे परत हलवले.

26 Nov, 23:19 (IST)

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, उद्या मेट्रो सेवा दिल्ली ते एनसीआर अशी उपलब्ध असेल. पुढील सूचना येईपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव एनसीआर स्थानकांवरून दिल्लीकडे जाणारी सेवा उपलब्ध असणार नाही. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने याबाबत माहिती दिली आहे.

26 Nov, 22:19 (IST)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली.

26 Nov, 21:45 (IST)

संविधान दिवसानिमित्त सियाचीन आणि कारगिल मधील भारतीय सशस्त्र दलाच्या सैनिकांकडून राज्यघटनेचे प्रस्तावना वाचन करण्यात आले.

Read more


आज कार्तिकी एकादशी. त्यानिमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्निक विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली. यावेळी कवडुजी भोयर आणि कुसुमबाई भोयर हे दांपत्य मानाचे वारकरी ठरले. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना व्हायरसचे संकट अवघ्या जगावर आहे. त्यामुळे कोरोना विषाणुवरील लस लवकर येऊ दे आणि जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठूरायाचरणी घातले आहे.

26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणूनही साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेले संविधान भारताने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले. म्हणून हा दिवस संविधान दिवस साजरा करण्याची प्रथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 पासून सुरु केली.

आज 26/11. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना सलाम करुया.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, देशासह राज्यात कोरोना व्हायरसचे संकट कायम असून दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच प्रशासनही सज्ज झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी सरकारने नवनवे नियम लागू केले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now