आंध्र प्रदेश येथे आणखी एक रुग्ण आढळला; राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 11 वर पोहचली; 26 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. यावरही नियंत्रण मिळवण्याचे पोलिस सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर गर्दी टाळण्याचं आवाहनही केलं जात आहे.

27 Mar, 05:35 (IST)

कोरोना विषाणू संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशसनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असताना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. भारतात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 694 पोहचली असून यात आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. नुकताच आंध्र प्रदेशमध्ये येथे एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला आहे. एएनआयचे ट्विट- 

 

 

27 Mar, 04:51 (IST)

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यातच महाराष्ट्रात आणखी 5 रुग्णांची भर पडली असून आता राज्यात कोरोनाबाधीतांचा आकडा 130 पोहचला आहे. एएनआयचे ट्वीट- 

 

27 Mar, 03:29 (IST)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. सध्या संपूर्ण भारतात 21 दिवसांकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात कोरोना बाधीत रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे राज्य सरकारने जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्यातील तब्बल 11 हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर (parole) सोडण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. ट्वीट- 

 

27 Mar, 02:24 (IST)

आज देशात कोरोना व्हायरसचे 88 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात एकूण कोरोना विषाणू प्रकरणांची संख्या 694 वर पोहोचली आहे.

27 Mar, 02:09 (IST)

G20 देशांद्वारे कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 5 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

27 Mar, 01:52 (IST)

जम्मू आणि काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या केंद्रशासित प्रदेशात 2 जी मोबाइल इंटरनेट सेवा (पोस्ट पेड आणि व्हेरीफायड प्री-पेड सिम कार्ड) 3 एप्रिल, 2020 पर्यंत वाढविण्यात आल्याचा निर्णय घेतला आहे.

27 Mar, 01:19 (IST)

सध्याच्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार आपले एक महिन्याचे वेतन, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी व 'प्रधानमंत्री सहाय्यता निधी'ला देणार आहेत. मा. शरद पवार यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

27 Mar, 24:50 (IST)

जागतिक महामारीच्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताने, आंतरराष्ट्रीय उड्डाणावरील बंदी 14 एप्रिल 2020, संध्याकाळी साडेसहापर्यंत वाढविली आहे. मंजुरी मिळालेले सर्व आंतरराष्ट्रीय मालवाहू ऑपरेशन्स आणि उड्डाणांसाठी हा नियम लागू नसणार.

27 Mar, 24:17 (IST)

सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत, सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही माहिती दिली.

27 Mar, 24:04 (IST)

बजाज ग्रुपने कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. पुण्यात, कोरोनाशी सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या आरोग्य सेवेच्या मूलभूत सुविधांसाठी बजाज ग्रुप मदत करेल. तसेच ही मदत आयसीयू अपग्रेड करण्यासाठी, अतिरिक्त व्हेन्टिलेटर खरेदी करण्यासाठी उपयोगी पडेल. 

26 Mar, 22:29 (IST)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना राहते घर सोडण्याचा आग्रह घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या करत आहेत. मात्र अशा प्रकारची सक्ती केल्यास संबंधित घरमालक किंवा सोसायटीवर कारवाई करण्याचा इशार राज्य सरकारने दिला आहे.

26 Mar, 22:05 (IST)

भारतीय वायुसेनेने  (IAF) प्रत्येकी 200-300 क्षमतेच्या 9 क्वारंटाइन सुविधा सुरु केल्या आहेत. कमांड हॉस्पिटल एअर फोर्स बंगलोर येथे कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी पहिली लॅब सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर डॉक्टर्सं आणि औषधे लेह पर्यंत पोहचवण्याचे काम भारतीय वायुसेना करणार आहे. तसंच चंदीगड आणि दिल्लीत रक्त तपासणीसाठी रक्ताचे नमुने पोहचवण्यासाठीही भारतीय वायुसेना सज्ज आहे.

26 Mar, 21:28 (IST)

कोरोना व्हायरसमुळे असलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घरपोच औषधे पुरवण्यासाठी भारत सरकारने परवानगी दिली आहे.

26 Mar, 20:41 (IST)

मलेशियामध्ये अडकलेल्य 300 विद्यार्थ्यांमध्ये 120 महाराष्ट्रातील मुलांचा समावेश आहे. दरम्यान असहाय्य असणार्‍या या विद्यार्थ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि एस. जयशंकर यांच्याकडे विनंती केली आहे.

26 Mar, 19:44 (IST)

100 पर्यंत कर्मचारी असणाऱ्या ऑरगनायझेशन ज्या मध्ये 90% कामगारांचा पगार 15000 पेक्षा कमी आहे, अशा ऑरगनायझेशनच्या पुढच्या तीन महिन्यांचा PF पूर्णपणे सरकारकडून दिला जाईल.

26 Mar, 19:32 (IST)

उज्ज्वला योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस सिलेंडर देण्यात येईल. याचा लाभ 3.3 कोटी कुटुंबाना होणार आहे. वृद्ध, दिव्यांग, पेन्शनर्स यांच्या खात्यात 1000 रुपये डीबीटीमार्फत दोन हप्त्यांमध्ये देण्यात येईल.

26 Mar, 19:17 (IST)

शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा करण्यात येतील. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम खात्यात जमा करण्यात येईल. तब्बल 8.69 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल.

26 Mar, 19:08 (IST)

लॉकडाऊनच्या काळात गरीब उपाशी राहू नयेत म्हणून गरीबांना 5 किलो तांदूळ किंवा गहू पुढील 3 महिन्यांसाठी मोफत मिळणार तर एक किलो डाळही मोफत दिली जाईल. 80 कोटी लोकांना याचा लाभ घेता येईल.

26 Mar, 19:01 (IST)

प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा करण्यात आली आहे. गोरगरीब जनता, कामगारांसाठी 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज घोषित करण्यात आले आहे. तसंच डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर यांना 50 लाखांचा विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. विम्याचा लाभ साधारणपणे 20 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Read more


कोरोना व्हायरसच्या देशावर असलेल्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारत देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. यावरही नियंत्रण मिळवण्याचे पोलिस सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर गर्दी टाळण्याचं आवाहनही केलं जात आहे.

भारतात 600 हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असून महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे 117 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांना देखील कोरोनाच्या संकटाची गंभीरता लक्षात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. अन्नधान्य, भाजीपाला, दूध या जीवानश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासह बँका देखील खुल्या राहणार आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तसंच कोरोना व्हायरस संबंधित माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने 9013151515 हा व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. यावरील सेवा 24 तास सुरु राहणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यातील नागरिकांसाठी व्हॉट्सअॅप नंबर जारी केला आहे. लॉकडाऊनच्या काळात काही अडचण आल्यास +91 2026127394 या व्हॉटस्अॅप चॅटबॉटवर प्रश्न विचारुन तुमच्या शंकेचे निरसन करु शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement