राजस्थान: बीकानेर येथे रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू तर, 3 जण जखमी; 26 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

27 Feb, 04:22 (IST)

राजस्थानमध्ये बीकानेर येथे रस्ता अपघातात 3 जणांचा मृत्यू तर, 3 जण गंभीर जखमी झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्वीट- 

 

27 Feb, 03:28 (IST)

राज्यातील सर्व शाळेमध्ये मराठी विषय सक्तीचा व्हावा, यासाठी राज्य सरकार अग्रेसर आहे. तसेच राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी हा विषय सक्तीचा करण्यात यावा, यासंदर्भातील विधेयक विधीमंडळाच्या विधानसभेत मांडण्यात आला होता. यातच महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचा विषय अनिवार्य करणारा विधेयक विधीमंडळाच्या विधानसभेत मंजूर झाला आहे. ट्वीट-

 

 

27 Feb, 02:46 (IST)

अंबरनाथ येथील डावलपाडा परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने एका दुकानाला आणि घराला आग लागली आहे. तसेच या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गॅस सिलिंडरचा स्फोट नेमका घरात झाला की दुकानात अद्याप याची माहिती समोर आली नाही. 

27 Feb, 02:12 (IST)

काँग्रेस नेते उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार असल्याचे वृत्त ANI ने  दिले आहे. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

27 Feb, 01:40 (IST)

कोरोना व्हायरसमुळे जपानच्या तटावर थांबवून ठेवण्यात आलेले डायमंड प्रिन्स जहाजावर बहुसंख्येने नागरिक अडकले होते. त्यामध्ये काही भारतीय सुद्धा होते. तर सकारकडून पाठवण्यात आलेल्या एअर इंडियाच्या विमानाने भारतीय नागरिक सुखरुप परतले आहेत.

27 Feb, 01:03 (IST)

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनाचे हिंसाचारात रुपांतर झाले आहे. या दरम्यान आता पर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिंसाचार झालेल्या घटनास्थळांना भेट देणार आहेत. त्यानंतर काय भुमिका घ्यायची याबाबत निर्णय घेणार असल्याचे ही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

27 Feb, 24:51 (IST)

सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अनिल भोसले यांना 6 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

27 Feb, 24:44 (IST)

बँकांच्या एटीएमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा न ठेवण्याच्या सुचनेवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

26 Feb, 23:34 (IST)

हिंगोली मधील ऑनलाईन पद्धतीने तुर खरेदी करताना शेतकऱ्याला जात विचारल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. 

26 Feb, 23:20 (IST)

दिल्ली हिंसाचारात शहीद झालेल्या पोलीस हेस्ट कॉन्स्टेबलच्या परिवाला 1 करोड रुपये आणि नोकरी देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी दिले आहे. 

26 Feb, 23:03 (IST)

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनाला हिंसेचे वळण लागले आहे. त्यामुळे राज्यातील बोर्डाच्या आणि शाळेच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर आता उद्या (27 फेब्रुवारी) नॉर्थ इस्ट भागात CBSE ची परीक्षा उद्या होणार असल्याची माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून देण्यात आली आहे.

https://publish.twitter.com/?query=https%3A%2F%2Ftwitter.com%2FANI%2Fstatus%2F1232632357435236352&widget=Tweet

26 Feb, 22:35 (IST)

NSA अजित डोभाल यांच्याकडून मौजपूर येथे दिल्लीतील हिंसाचाराच्या परिस्थिती पाहणी करण्यात येत आहे.

26 Feb, 22:05 (IST)

महाराष्ट्रात सर्व मंडळांच्या शाळांमध्ये 1-10 वी इयत्तेत मराठी भाषा विषय 2020-21 पासून अनिवार्य करणार. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त मांडण्यात येणार असल्याची माहिती  शालेय शिक्षणमंत्री  वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

26 Feb, 21:07 (IST)

कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये 15,358 शेतकर्‍यांची यादी जाहीर केल्यानंतर आता शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी 28 मार्च दिवशी जाहीर होणार असल्याची बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेमध्ये दिली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, पाहा कोणाला मिळाला लाभ?

 

 
26 Feb, 20:35 (IST)

नॉर्थ ईस्ट दिल्लीमधील मृतांचा आकडा वाढला आहे. जीटीबी रूग्णालयात 21 जणांचा मृत्यू झाला असून लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

26 Feb, 20:20 (IST)

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. हे मंडळ विशिष्ठ विचारसरणीच्या लोकांचा पुरस्कार करते असा आरोप करत हे मंडळ बंद करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली होती. या मागणीनंतर  शिलेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हे मंडळ रद्द करत असल्याची माहिती सभागृहाला दिली.

26 Feb, 20:11 (IST)

वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेले पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांची संख्या जवळपास 100 इतकी असून, लवकरच त्यांची आणि राष्ट्रवादी नेतृत्वाची बैठक मुंबई येथे पार पडण्याची शक्यता आहे.

26 Feb, 20:03 (IST)

शिवसेना आजच्याइतकी लाचार कधीच पाहिली नव्हती. काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय मंत्री मनिशंकर अय्यर यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र टीका केली होती. अय्यर यांच्या पोस्टरला जोडे मारले होते. पण, आजची शिवसेना सावरकरांबाबत आक्षेपार्ह लिखान काँग्रेसने छापूनही गप्प बसली आहे. सेनेचे सावरकरांवरील प्रेम बेकडी आहे. आम्ही ते सहन करणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.

26 Feb, 19:59 (IST)

मीरा भाईंदर महापालिका महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. या निवडुकीत भाजपच्या जोत्स्ना हसनाळे महापौर तर, हसतमूख गेहलोत हे उपमहापौर झाले आहेत. हसनाळे आणि गेहलोत यांनी अनुक्रमे शिवसेनेच्या अनंत शिर्के आणि  काँग्रेसच्या मर्लिन डीसा यांचा पराभव केला.

26 Feb, 19:50 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. दरम्यान दिल्लीत वातावरणातील तणाव कमी व्हावा आणि व्यवहार लवकरात लवकर पूर्ववत होणं गरजेचे असल्याचं म्हटलं आहे.

Read more


शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी संचालक आणि एनसीपीचे विधानपरिषदेमधील आमदार अनिल भोसले यांसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काल (25 फेब्रुवारी) अनिल भोसले, सूर्याजी जाधव, कैलास भोसले आणि तानाजी पडवळ यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी अनिल भोसले यांच्यासोबत 11 जणांच्या विरोधात ठेवीदारांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरबीआय बॅंकेकडून 2018-19 मध्ये करण्यात आलेल्या ऑडिटनुसार, या बॅंकेमध्ये 71 कोटींचा घोटाळा झाल्याची बाबा समोर आली आहे. सध्या या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू आहे. आज (26 फेब्रुवारी) आरोपींवर शिवाजीनगर न्यायालयामध्ये अरोपींना हजर करण्यात येणार आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या एकूण 14 शाखा आहेत. तर या बॅंकेचे 16 हजार खातेदार आहेत. बँकेकडून मागील काही दिवसांमध्ये 12 कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now