आसाममध्ये आज कोविड-19 चे 61 नवे रुग्ण; 95 जणांची कोरोनावर मात ; 25 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

26 Dec, 05:29 (IST)

आसाममध्ये आज  कोविड-19 चे 61 नवे रुग्ण आढळून आले असून 95 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 2,15,836

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 2,11,378

मृतांचा आकडा: 1,033

सक्रीय रुग्ण: 3,422

26 Dec, 05:01 (IST)

ख्रिसमसच्या दिवशी अमेरिकेत टेनेसी मधील Nashville येथे स्फोट झाला असून हा स्फोट हेतुपुरस्सर झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहेः रॉयटर्स

26 Dec, 04:29 (IST)

कोविड-19 लॉकडाऊनमुळे शबरीमला मंदिराच्या उत्पन्नात घट झाली आहे. उत्पन्न 156.60 कोटींवरुन 9.09 कोटींवर आले आहे. 39 दिवसांत 71,706 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे.

26 Dec, 04:08 (IST)

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भोपाळ येथील पुतळ्याचे अनावरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ट्विट-

 

26 Dec, 02:28 (IST)

जम्मू-काश्मीर सरकारने गॅंदरबल आणि उधमपूर जिल्ह्यात 8 जानेवारीपर्यंत हाय-स्पीड मोबाईल डेटा सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर उर्वरित जिल्ह्यात टू-जी मोबाइल इंटरनेट सेवा कार्यरत राहतील. ट्विट-

 

26 Dec, 01:08 (IST)

दिल्लीत आज 758 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 6 लाखांच्या वर पोहचली आहे. ट्विट-

 

26 Dec, 24:36 (IST)

भिवंडीतील काँग्रेसचे 18 नगरसेवकांनी राष्ट्रावादीत प्रवेश केला आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. ट्विट- 

 

25 Dec, 23:23 (IST)

धारावी परिसरात आज एकाही  कोरोनाबाधितांची नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. धारावीत एक एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आला होता. ट्वीट-

 

25 Dec, 23:18 (IST)

देशभरातल्या शेतकाऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित असून पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ट्वीट-

 

25 Dec, 22:22 (IST)

उत्तर प्रदेशात महिलेवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार  करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली  आहे.

25 Dec, 22:04 (IST)

उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते पंडित विनोद मिश्रा यांनी दिला पक्षाचा राजीनामा दिला आहे.

25 Dec, 21:41 (IST)

Farm Law च्या विरोधात आंदोलत करत असलेल्या शेतकऱ्यांकडून पोलिसांच्या अंगावर ट्रॅकटर चालवल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडिओत कैद झाला आहे.

25 Dec, 21:11 (IST)

ट्युनिशियाच्या किनाऱ्याजवळ बोट बुडाल्यानं 20 स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे.

25 Dec, 20:56 (IST)

केरळात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देशाच्या बळींच्या आकड्याच्या सरसरीपेक्षा अधिक  आहे.

25 Dec, 20:35 (IST)

शेतकरी आंदोलनाचं विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा भाजपाचा आरोप करण्यात आला आहे.

25 Dec, 20:20 (IST)

पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ आणि पाँडेचेरी च्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींची भेट घ्यावी असे अशोक गहलोत यांनी म्हटले आहे.

25 Dec, 19:53 (IST)

जे सहानुभूतीशील बनून शेतकर्‍यांची दिशाभूल करीत आहेत त्यांना भविष्यात जनता धडा शिकवेल असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे.

25 Dec, 19:39 (IST)

TRP Scam प्रकरणी BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

25 Dec, 19:09 (IST)

रजनीकांत यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल केले. त्यांना तीव्र रक्तदाब असल्याचे आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात अॅडमीट करण्यात आले. त्यांचा रक्तदाब नियंत्रित होईपर्यंत आणि त्यांना डिस्चार्ज मिळेपर्यंत डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन असणार आहे- अपोलो हॉस्पिटल, हैदराबाद

25 Dec, 18:54 (IST)

आज देशातील कृषी कायद्यांमुळे APMC नष्ट होईल असे जे लोक सांगत आहेत ते लोक केरळ, पश्चिम बंगाल यांच्याबाबत मौन बाळगत आहेत. केरळ, पश्चिम बंगाल राज्यांमध्ये APMC अस्तित्वात नाही. तर तेथे आंदोलन का नाही होत? परंतू, केरळ, पश्चिम बंगालमधून जाऊन पंजाबमधील शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Read more


आज ख्रिस्ती धर्मियांसाठी मोठा दिवस असून नाताळचा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. चर्चमध्ये प्रार्थनेसह प्रभू येशूकडे प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा व्यक्त करताना दिसून येतील. आनंद आणि उत्साहाने भरलेला हा सण प्रत्येकजणाने अत्यंत साधेपणाने आणि घरच्या घरी साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काही ठिणाकी रात्रीच्या वेळेस संचार बंदी ही लागू करण्यात आली आहे. केरळ, गोवा, महाराष्ट्र, दिल्ली सारख्या शहरातील चर्चमध्ये क्रिसमस निमित्त मोठी रोषणाई पहायला मिळाली. तसेच मोजक्याच संख्येच्या उपस्थितीने ख्रिस्ती धर्मियांनी मास्क घालून प्रार्थनेला हजेरी लावली.

दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरुच आहे. तर शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करुन त्यावर तोडगा काढावा असे स्पष्ट केले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये बैठका पार पडत आहे. परंतु या बैठकीतून ही काही निष्पन्न झालेले नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमएसपी कायम राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण होत आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने केले जाऊ लागले आहे. नोएडा आणि गाझियाबाद येथून दिल्लीत येणाऱ्या वाहतूकीसाठी चीला, गाझिपूर बॉर्डर बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूकदारांना पर्यायी मार्गांचा वापर करावा अशा सूचना दिल्या आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

जगभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या रुपामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनावरील लस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभुवीर, या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात युनायटेड किंगडम येथे 60 हजारांहून अधिक नागरिकांना फायझर बायोटेक कोविड19 ची लस देण्यात आली आहे. याबद्दल रॉयटर्सने ब्रिटीश सरकारच्या रिपोर्ट्स मध्ये म्हटले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now