कस्टम डिपार्टमेंटच्या संयुक्त कारवाईत एका तस्कराला सोन्याच्या बार (अंदाजे दीड ते दोन कोटी रुपये) सह पकडण्यात आले. मिझोरमच्या चंपाईच्या चुंगते गावात ही कारवाई झाली.
गोव्यामध्ये आज कोरोना विषाणूच्या 673 रुग्णांची व 7 मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण संसर्गाच्या प्रकरणांची संख्या 30,552 वर पोहोचली आहे व एकूण मृत्यूंची संख्या 383 वर पोहोचली आहे. सध्या राज्यामध्ये 5,822 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. संपूर्ण भारतात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यातच असम येथील कोरोनाबाधित येथील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 4 हजार 568 वर पोहचली आहे. ट्विट-
रुग्णांना किफायतशीर दरात प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रति पिशवी किंमत निश्चित करण्यात आली आहे. तसेच साडेपाच हजार इतका कमाल दर आकरण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. ट्विट-
जम्मू कश्मीर पोलीस आणि लष्कर, सीआरपीएफ जवानांनी केलेल्या कारवाईत आज मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जम्मू कश्मरमधील कुलगाम काझीगुंड परिसरात हा शस्त्रसाठा, रोख रक्कम आणि काही प्रमाणात कागदपत्रे जप्त करण्यात आली. इतकी सामग्री एका वाहनातून वाहून नेण्यात येत होती.
मुंबईत आज सायंकळी 6 वाजेपर्यंत (गेल्या 24 तासात) 2163 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. 24तासात बरे झालेले रुग्ण- 1550 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती मुंबई महापालिकेने दिलीआहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 19,164 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. 17,184 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 459 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 12,82,963 इतकी झाली आहे.
दिल्ली येथे गेल्या 24 तासात 3,834 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 36 जणांचा मृत्यू आहे. दिल्लीतील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 2,60,623 इतकी झाली आहे. यातिल 2,24,375 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 31,125 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत दिल्लीमध्ये 5,123 जणांचा मृत्यू झाला आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबीने दीपिका पादुकोन हिला समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार 26 सप्टेंबरला दीपिका हिस एनसीबी चौकशीला सामोरे जायचे आहे. दरम्यान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग याच्यासह गोवा विमानतळ, पणजी येथे दाखल झाली आहे.
देशातील युवा शक्ती विचारत घेता खेळांचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर आहे. अशा स्थितीत देशी खेळ लोकप्रिय बनविण्यासाठी स्वदेशी खेळांचे ग्रामिण ऑलिम्पीक भरवण्याचा मानस शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी व्यक्त केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या पर्वासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यात सामना होत आहे. सामन्याला सुरुवात झाली असून, आरसीबी (RCB) ने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सायमन खंबाटा आणि श्रुती मोदी यांनानारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आज समन्स बजावले. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अनेकांची चौकशी सुरु आहे. या चौकशीला उपस्थित राहण्यासाठी बॉलिवूडमधील अनेकांना समन्स बजावण्यात आले आहे.
प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. तसेच कृत्रिम जीवन रक्षक प्रणालीचा वापरही करण्यात येत आहे. एमजीएम रुग्णालयाने बालसुब्रह्मण्यम यांच्या आरोग्याविषयी हेल्थ बुलेटीन जारी केले. यात ही माहिती देण्यात आली आहे. 5 ऑगस्टला त्यांना एमजीएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
जम्मू कश्मीर येथे अॅड. बाबर कादरी यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. पोलीसांनी तपास सुरु केला असून, गोळीबार करणाऱ्यांची माहिती लवकरच पुढे येईल अशी आशा आहे.
जम्मू कश्मीर येथे अॅड. बाबर कादरी यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. पोलीसांनी तपास सुरु केला असून, गोळीबार करणाऱ्यांची माहिती लवकरच पुढे येईल अशी आशा आहे.
कर्नाटकमधील एका ड्रग्ज प्रकरणात बंगळुरु पोलिसांनी अँकर अनुश्री हिस नोटीस पाठविण्यात आली आहे. या प्रकरणात डान्सर किशोर शेट्टी यास अटक करण्यात आली आहे., अशी माहिती बंगळुरुचे डीसीपी विनय गोंकर यांनी दिली आहे.
मुंबईमध्ये काल विस्कळीत झालेली लोकल सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आज मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करू शकणार आहेत. आज मुंबई मध्ये पावसाने उसंत घेतली असल्याने पुन्हा रस्ते आणि रेल्वे मार्ग यावरील वाहतूक सुरळीत करण्यास यश आलं आहे.
भिवंडीमध्ये मागील 4 दिवसांपासून सुरू असलेले पटेल इमारत दुर्घटनेचं बचावकार्य आज देखील सुरू आहे. आता या दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 41 पर्यंत पोहचला आहे. 21 सप्टेंबरच्या पहाटे ही दुर्घटना झाली होती. 25 जणांना यामधून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
दरम्यान भारतामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव वाढता असला तरीही त्याच तुलनेत रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांग़ले असल्याने देशात कोरोना व्हायरसच्या संख्येमुळे मृत्यू होणार्याचं प्र्माणअही आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारला, आरोग्य यंत्रणेला यश येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र आणि दसरा सणही साधेपणाने साजरा करण्याचे तसंच मास्कचा वापर, सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्येण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात महिन्याभरापूर्वी गणेशोत्सवादरम्यान काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने नियंत्रणात आलेल्या कोरोनाच्या फैलावाचं पुन्हा प्रमाण वाढलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)