मुंबईच्या साकी नाका येथे झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू आणि पाच जखमी; 24 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

25 Nov, 05:23 (IST)

महाराष्ट्र: मुंबईच्या साकी नाका येथे झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू आणि पाच जखमी. आग आटोक्यात आणली गेली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

25 Nov, 05:21 (IST)

नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान अनिवार्य मास्क नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना सध्याच्या 500 रुपयांपेक्षा अधिक 1000 रुपये दंड आकारला जाईल.

25 Nov, 04:50 (IST)

निवार चक्रीवादळामुळे इंडिगोच्या दक्षिणेकडील भागातील प्रामुख्याने चेन्नई येथे किंवा तेथून जाणारी उड्डाणे विस्कळीत झाली आहेत. उद्या ठरलेल्या 49 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून त्यावर निर्णय घेऊ, अशी माहिती इंडिगोने दिली आहे. ट्विट-

 

25 Nov, 04:09 (IST)

All India Muslim Personal Law Board चे उपाध्यक्ष Maulana Kalbe Sadiq यांचे लखनऊ येथील रुग्णालयात निधन झाले आहे.

25 Nov, 03:52 (IST)

अफगाणिस्तानच्या बामियान शहरात झालेल्या स्फोटात 17 ठार तर किमान 50 जखमी झाले आहेत. TOLONews ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

25 Nov, 03:16 (IST)

एअर इंडिया सॅटच्या दोन कर्मचार्‍यांसह 3 जणांना कस्टम अधिकाऱ्यांनी 1480 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पेस्टच्या दोन पाकिटांसह पकडले. सोन्याचे मूल्य 72,52,888 रुपये आहे. मुख्य आरोपीने कबूल केले की त्याने आणखी तीन वेळ सोन्याची तस्करी केली. कस्टम डिपार्टमेंट टी-3, आयजीआय विमानतळ, दिल्ली यांनी ही माहिती दिली.

25 Nov, 03:01 (IST)

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 939 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या 2,77,446 वर पोहोचली आहे. आज शहरात 19  रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यूंची संख्या 10,706 वर गेली आहे.

25 Nov, 02:24 (IST)

Cyclone Nivar मुळे चेन्नई विमानतळावरील उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत चेन्नई विमानतळावरील तीन उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच विमान सेवा, राज्य प्रशासन आणि एमईटी विभाग सुरळीत कामकाजासाठी विमानतळावर एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती चेन्नई विमातळाकडून देण्यात आली आहे.

25 Nov, 01:58 (IST)

दक्षिण पश्चिम रेल्वेच्या पहिल्या निर्यात-नवीन न्यू मॉडिफाइड गुड्स रॅकला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

25 Nov, 01:18 (IST)

Coronavirus in Maharashtra: राज्यात आज कोविड-19 चे 5,439 नवे रुग्ण आढळून आले असून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 17,89,800 वर पोहचली असून 46,683 मृतांची नोंद झाली आहे.

25 Nov, 01:08 (IST)

उत्तराखंड मध्ये आज कोविड-19 चे 528 नवे रुग्ण आढळून आले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

25 Nov, 24:16 (IST)

Mangaluru: दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पलडका येथील शंभवी नदीत चार जण बुडाले

24 Nov, 23:41 (IST)

भारतात सुमारे 30 लसी विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. त्यापैकी दोन कॉव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसी विकासाच्या अत्यंत प्रगत अवस्थेत आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पहिल्या Virtual SCO Young Scientist Conclave मध्ये दिली.

24 Nov, 23:38 (IST)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100 आसनांचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.

24 Nov, 23:16 (IST)

महाराष्ट्र: नकारात्मक कोविड-19 चाचणी अहवाल असलेल्या लोकांना केवळ महाराष्ट्रात प्रवेश करण्याची परवानगी मिळाल्यानंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने राज्य शासनाकडून वाहनचालकांच्या हालचाली, व्यावसायिक वाहनांच्या क्रू सदस्यांच्या हालचालीबाबत त्वरित स्पष्टीकरण मागितले आहे.

24 Nov, 22:53 (IST)

भिंत कोसळल्यामुळे स्थगित झालेली कुर्ला-चुनाभट्टी मार्गावरील रेल्वेसेवा सुरळीत

24 Nov, 22:35 (IST)

भारतामध्ये Information Technology Act section 69A अंतर्गत 43 मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक करण्यात आले आहेत.

24 Nov, 22:22 (IST)

मुंबई: हार्बर मार्गावर Kurla - Chunabhatti दरम्यान वहातूक सेवा ठप्प, अर्धा तासांत सुरू होईल सेवा अशी  माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. दरम्यान संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याने तांंत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ही 4.15 च्या सुमाराची घटना आहे.

24 Nov, 21:46 (IST)

21 ऑक्टोबर पासून बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर अखेर राजस्थानच्या जयपूर मध्ये  सापडले आहेत. पुणे पोलिसांनी त्यांना  ताब्यात घेतलं आहे.  

24 Nov, 21:30 (IST)

Kangana Ranaut आणि Rangoli Chandel ला  Bombay High Court कडून अंतरिम दिलसा मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान आक्षेपार्ह ट्वीट करत त्यांनी समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात FIR दाखल आहे. मात्र  त्यांना 8 जानेवारीला मुंबई पोलिसांसमोर दाखल होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read more


भारतामध्ये दिवाळीचा सण उलटल्यानंतर आता पुन्हा नव्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढायला सुरूवात झाली आहे. दरम्यान भारतामध्ये दिल्ली, राजस्थान, गुजरात येथील वाढत्या रूग्णांची संख्या राज्य सरकारकडून कडक पावलं उचलली जात आहेत. अशामध्ये आता देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा चर्चा करणार आहेत. ही बैठक मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये होणार आहे.

दरम्यान महाराष्ट्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर होणार का? अशी चर्चा रंगायला लागली आहे. अद्याप लॉकडाऊन जाहीर झालेला नाही. मात्र परिस्थिती पाहता कडक निर्बंध घालण्याची शक्यता आहे.अद्याप भारताकडे लस नाही येत्या काही महिन्यांत लस हातात येण्याची शक्यता आहे पण तो पर्यंत लोकांना संयम बाळगणं आवश्यक आहे. त्यासाठी कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्रात सध्या पुन्हा राजकीय अस्थिरतेचा मुद्दा चर्चेमध्ये आला आहे. कालच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी येत्या 2-3 महिन्यामध्ये भाजपा महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करेल असा दावा ठोकला आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now