देशात कचरामुक्त शहरांच्या यादीत पुणे शहराला केंद्र सरकारकडून '3 स्टार शहर' म्हणून मानांकन; 24 जून 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी लेटेस्टली मराठीसह जोडलेले राहा...
देशात कचरामुक्त शहरांच्या यादीत पुणे शहराला केंद्र सरकारकडून '3 स्टार शहर' म्हणून मानांकन मिळाले आहे. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वच्छता सेवक, अधिकारी आणि सर्व पुणेकरांना मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.
पुणे शहरात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, शासकीय-खासगी कार्यालयात वावरताना मास्क वापरणे बंधनकारक असून, मास्क न वापरणाऱ्यांवर 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पुणे महापूर मुरलीधर मोहळ यांनी याबाबत माहिती दिली.
डब्ल्यूएचओ डायरेक्टर-जनरल यांनी पुढील आठवड्यात जगातील कोरोना विषाणू संक्रमितांची संख्या 1 कोटी होऊ शकते अशी शक्यता वर्वली आहे. ते म्हणाले, 'सध्या कोरोना व्हायरस लस आणि उपचारांचा अभ्यास चालू ठेवत असतानाही,आपण आपली काळजी घेण्यासाठी, विषाणूचे प्रसारण रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी प्रयत्नशील असण्याची जबबदारी आपली आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, संजय कुमार हे महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव होणार आहेत व जुलैमध्ये ते पदभार स्वीकारतील. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
नोएडा मेट्रो रेल कोऑपरेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सजेंडर समुदायाला समर्पित असणारे नोएडा मेट्रो रेल कोऑपरेशनचे सेक्टर-50 मेट्रो स्टेशन हे आता 'रेनबो' स्टेशन म्हणून ओळखले जाणार आहे.
सरकारने आधार पॅनशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे, तसेच वित्तीय वर्ष 2018-19 साठी आय-टी रिटर्न भरण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै, 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
मुंबईत आज 1144 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 69,625 इतकी झाली आहे.
महाराष्ट्रात आज 208 जणांचा मृत्यू झाला असून 3890 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1,42,900 इतकी झाली आहे.
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात दोन मुली कोरोना बाधित आढळल्या आहेत. जिल्ह्यातल्या कोरोना बाधितांची संख्या आता 98 झाली आहे. दरम्यान, सेलू शहरातला हसमुख कॉलनी परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
महाराष्ट्र पोलिस दलात मागील 48 तासांत 185 पोलिसांना कोरोनाची लागण तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिस दलातील कोविड-19 ची रुग्णसंख्या 4288 इतकी झाली आहे. त्यापैकी 998 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तर 3239 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्र पोलिस दलातील एकूण 51 पोलिसांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Share Market Update: बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये घसरण पाहायला मिळत आहे. 561.45 अंकांची घसरण झाल्याने सेन्सेक्स 34,868.98 वर तर निफ्टीमध्ये 165.70 पॉईंटने घसरण झाली असून 10,305.30 वर पोहचला आहे.
देशासह महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचे संकट दिवसागणित दाट होऊ लागले आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 440215 वर पोहचला आहे. या संकटावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. कोरोना बाधितांसाठी क्वारंटाईन सेंटर्स आणि इतर सुविधांची सोय सरकारकडून करण्यात येत आहे. अनलॉकिंगच्या माध्यमातून देशातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतु, कोविड-19 संसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
दरम्यान देशात पेट्रोल डिझेलचे दर 7 जून पासून सातत्याने वाढत होते. मात्र आज पेट्रोलच्या दरामध्ये कोणतीही वाढ न झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर डिझेलचे दर मात्र 0.48 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे दिल्लीत आज पेट्रोल डिझेलचे दर अनुक्रमे 79.76 रु. प्रति लीटर आणि 79.88 रुपये प्रति लीटर इतके आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रातील मुंबई मध्ये कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी मुंबई महानगरपालिका विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देत आहे. दरम्यान काही मंडळी सामाजिक भान राखत कोरोनाग्रस्तांसाठी आपल्या परिने मदत करत आहेत. काही फ्री ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करत आहेत. तर काही क्वारंटाईन सेंटरसाठी बेड्स पुरवत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)