झारखंडमध्ये आज 314 नवे कोरोनाबाधित रुग्ण; 24 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

25 Jul, 05:05 (IST)

झारखंडमध्ये आज 314 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

25 Jul, 04:56 (IST)

आसामच्या कर्बी आंग्लाँग जिल्ह्यात 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. गेल्या 12 दिवसात हा चौथा भूकंप आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीचे नुकसान झाले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

 

25 Jul, 04:51 (IST)

कोरोना रुग्णावरील (Corona Patient) उपचारासाठी वापर होणाऱ्या औषधांची मागणी व उपलब्धतेतील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारींची अन्न व औषध प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून बनावट ग्राहकांद्वारे सापळा रचून रॅकेट शोधून काढण्याचा प्रयत्त्न केला जात आहे. राज्यात आतापर्यंत 4 कारवायांद्वारे 15 लोकांना अटक करण्यात आली आहे.

25 Jul, 04:50 (IST)

कर्नाटकः बेल्लारी जिल्ह्यातील Huvina Hadagali शहरातील हल्लाम्मा या 100 वर्षांच्या आजींनी कोरोना विषाणूवर मात केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, 'डॉक्टरांनी माझ्यावर योग्य उपचार केले व आता मी ठीक झाली आहे.' या आजींच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे.

25 Jul, 04:31 (IST)

आज तेलंगणामध्ये कोरोना विषाणूच्या 1,640 रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 1007 रुग्ण बरे झाले असून, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण प्रकरणांची संख्या 52,466 झाली आहे, यात 40,334 रुग्ण बरे झाले आहेत व 455 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

25 Jul, 03:49 (IST)

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवासी कामगारांना घरी नेण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनवर, रेल्वेने 2,142 कोटी रुपये खर्च केले. मात्र यामधून रेल्वेला फक्त 429 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

25 Jul, 03:34 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1,479 कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून, पुणे शहरातील एकूण संख्या आता 45,544 इतकी झाली आहे.

25 Jul, 03:11 (IST)

राजधानी दिल्लीत आज कोरोना व्हायरसची 1,025 प्रकरणे नोंदवली गेली असून, एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,28,389 झाली आहे. एकूण मृत्यूंची संख्या 3,777 वर पोहोचली आहे.

25 Jul, 02:39 (IST)

आज महाराष्ट्रात 9615  नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणे आणि 278 मृत्यूची नोंद झाली आहे. आज राज्यात 5714 रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे राज्यातील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या वाढून 3,57, 117 झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1,99,967 रुग्ण बरे झाले आहेत आणि 13,132 मृत्यू झाले आहेत.

25 Jul, 02:36 (IST)

आज मुंबईत कोरोना व्हायरसच्या 1062 रुग्णांची व 54 मृत्यूची नोंद झाली आहे. आज शहरामध्ये 1158 रूग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या वाढून 1,06,891 झाली आहे. यामध्ये 78,260 रूग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. शहरामध्ये आतापर्यंत एकूण 5981 मृत्यूंची नोंद झाली आहे.

25 Jul, 02:07 (IST)

गुजरात येथे आणखी कोरोनाचे 1068 रुग्ण आढळून आल्याने आकडा 53,631 वर पोहचला आहे.

25 Jul, 01:49 (IST)

धारावीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2519 वर पोहचला आहे.

25 Jul, 01:47 (IST)

उत्तराखंड येथे कोरोनाचे आणखी 272 रुग्ण आढळून आल्याने आकडा 5717 वर पोहचला आहे.

25 Jul, 01:35 (IST)

गोव्यात कोरोनाचे आणखी 190 रुग्ण आढळून आल्याने आकडा 4540 वर पोहचला आहे.

25 Jul, 01:21 (IST)

पंजाब येथे कोरोनाचे आणखी 482 रुग्ण आढळून आल्याने आकडा 12,216 वर पोहचला  आहे.

25 Jul, 01:07 (IST)

बिहार: पटना येथील AIIMS रुग्णालयातील कोविड19 च्या रुग्णाची रुग्णालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्याची घटना समोर आल्याने पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.

25 Jul, 24:47 (IST)

तमिळनाडू येथे कोरोनाच्या आणखी 6785 रुग्णांची भर तर 88 जणांचा बळी गेला आहे. 

25 Jul, 24:35 (IST)

जम्मू-कश्मीर येथे कोरोनाचे आणखी 353 रुग्ण आढळून आल्याने आकडा 9217 वर पोहचला आहे.

25 Jul, 24:11 (IST)

कर्नाटक येथे  आज कोरोनाचे आणखी 5007 रुग्ण आढळून आले तर 110 जणांचा बळी गेला आहे.

25 Jul, 24:06 (IST)

भाजपच्या 'लोकशाही हत्येच्या षडयंत्र', विरोधात शनिवारी सकाळी 11 वाजता राजस्थानमधील सर्व जिल्हा मुख्यालयात कॉंग्रेसचे कार्यकर्ते निदर्शने करणार आहेत. पीसीसी अध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनी याबाबत माहिती दिली.

Read more


एकीकडे संपूर्ण देश हा कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महाभयाण विषाणूशी झुंज देत आहे. तर दुसरीकडे देशात अनेक राज्य भूकंपांनी हादरले आहेत. त्यात पावसामुळे अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात (Palghar District) मध्यरात्री 12.26 च्या सुमारास 3.1 रिश्टेर स्केल तीव्रताचे भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. ही माहिती भूकंपविज्ञान केंद्राच्या (National Centre for Seismology) हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्य याआधी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे.

कोरोना व्हायरस बद्दल भारतातील परिस्थितीचा विचार केला असता देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 12,38,635 वर पोहचला आहे. त्यापैकी 4,26,167 सक्रीय रुग्ण असून रुग्ण 7,82,606 कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात एकूण 29,861 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (COVID 19) संक्रमितांची संख्या 3,47,502 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 1,36,980 रुग्णसंख्येचाही समावेश आहे.

यात एक दिलासादायक बात म्हणजे फार्मा कंपनी सिपला कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी लवकरात लवकर Favipiravir हे अँटी व्हायरल औषध लाँच करणार आहे. हे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी काही अंशी मदत करेल अशी आशा आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement