बलिया: पत्रकार रतन सिंह याची गोळ्या झाडून हत्या ; 24 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबई सह देशा-परदेशातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी मराठी लेटेस्टली ला नक्की भेट द्या.

25 Aug, 05:10 (IST)

बलिया येथे पत्रकार रतन सिंह याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

25 Aug, 04:55 (IST)

वैष्णो देवीसाठी ऑनलाईन यात्रा आणि हेलिकॉप्टर बुकिंगची सुविधा येत्या 26 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दम्यान सुरु राहणार आहे.

25 Aug, 04:37 (IST)

रायगड येथे इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत.

25 Aug, 04:25 (IST)

आसाम येथे कोरोनाचे आणखी 1879 रुग्ण आढळून आल्याने आकडा 92,619 वर पोहचला आहे.

25 Aug, 04:12 (IST)

रिपब्लिकन पक्षाने अध्यक्ष आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प आणि माईक पेंस यांना अधिकृत नामांकन जाहीर केले.

25 Aug, 03:45 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1,101 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 84,496 झाली आहे. तर 1,188 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 14,686 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 4,07,924 झाली असून आज 5,129 टेस्ट घेण्यात आल्या.

25 Aug, 03:37 (IST)

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 5851 रुग्ण आढळले आहेत.

25 Aug, 03:17 (IST)

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील 2 आरोपींचा जामीन कोल्हापूर कोर्टाने फेटाळला आहे.

25 Aug, 03:06 (IST)

अरुणाचल प्रदेशात कोरोनाचे आणखी 49 रुग्ण आढळून आल्याने आकडा 3312 वर पोहचला आहे.

25 Aug, 02:55 (IST)

राजस्थान येथे कोरोनाचे आणखी 12 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1346 वर पोहचला आहे.

25 Aug, 02:44 (IST)

रागयड येथे इमारत कोसळल्याच्या दुर्घनटनेप्रकरणी सहकार्य करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी NDRF सोबत चर्चा केली आहे.

25 Aug, 01:57 (IST)

मुंबईत मागील 24 तासांत 743 नवे रुग्ण आढळले असून 20 जण दगावल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या  1,37,091 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 7,439 वर पोहोचली आहे.

25 Aug, 01:52 (IST)

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात पाच मजली इमारतीचे 3 मजले कोसळले असून यात 200 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यात 15 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य अद्याप सुरु आहेत अशी माहिती महाराष्ट्राचे मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

25 Aug, 01:38 (IST)

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 11,015 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 212 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 6,93,398 वर पोहोचली आहे.

25 Aug, 01:38 (IST)

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 11,015 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 212 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 6,93,398 वर पोहोचली आहे.

25 Aug, 01:31 (IST)

हरियाणा चे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना COVID-19 लागण झाली असून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्वरित क्वारंटाईन व्हावे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे. तसेच मागील आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्वरित कोरोनाची चाचणी करावी असे आवाहनही केले आहे.

25 Aug, 01:14 (IST)

रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये घर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. NDRF च्या तीन टीम घटनास्थळी रवाना झाल्याचे या विभागाकडून सांगण्यात येत आहे.

25 Aug, 01:00 (IST)

ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांची प्रकृती सध्या स्थिर असून अजूनही ते व्हेंटिलेटवर उपचार घेत आहेत अशी माहिती एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयाने दिली आहे. त्यांच्यावर डॉक्टरांची वैद्यकिय टीम इलाज करत आहेत असेही सांगण्यात येत आहे.

25 Aug, 24:27 (IST)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून एकूण 962 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात 14 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 523 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

24 Aug, 23:59 (IST)

सात तासांच्या चर्चेनंतर CWC बैठक अखेर संपली आहे. या बैठकीत पुढील 6 महिन्यात नवीन प्रमुख निवडीपर्यंत सोनिया गांधीच काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून राहतील असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read more


महाराष्ट्रासह सध्या जगभरात कोरोना व्हायरसच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा केला जात आहे. काल दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता ज्येष्ठा गौरी आवाहन आणि पुजनासाठी जंगी तयारी सुरू आहे. दरम्यान अनेक गणेशभक्त साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या आणि मृत्यू प्रकरणी तपासासाठी सीबीआयचं पथक मुंबईमध्ये दाखल झाले आहे. मागील 2 दिवस सुशांतच्या घराची तपासणी केल्यानंतर आता आज त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान कॉंग्रेस पक्षामध्येही आता मोठ्या बदलांचे संकेत मिळत आहेत. पक्षात नेतृत्त्व बदल होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा कार्यकाळ संपत असल्याने आता त्या राजीनामा देण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसमधील एका गटाचा राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचं पुन्हा नेतृत्त्व देण्याची मागणी आहे. तर काहींनी सामूहिक नेतृत्वाची मागणी पत्राद्वारा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement