IPL 2020: मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी केले पराभूत; 23 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, लेटेस्ट अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीसह जोडलेले रहा...

24 Sept, 05:20 (IST)

आयपीएल 2020 मध्ये, युएईच्या शेख जाएद स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला 49 धावांनी पराभूत केले. कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत मुंबई इंडियन्सच्या 195 धावांच्या विरुद्ध 146/9 धावा केल्या.

24 Sept, 04:46 (IST)

2019 मध्ये भारतातील 2.56 लाख हेक्टर क्षेत्र जंगलात लागलेल्या आगीमुळे बाधित झाले आहे. पर्यावरण मंत्रालयाने लोकसभेत ही माहिती दिली.

24 Sept, 04:25 (IST)

तामिळनाडू येथे 28 आठवड्यात मुलाला जन्म देणारी महिला कोरोनामुक्त झाली आहे. ट्वीट- 

 

 

24 Sept, 04:11 (IST)

असाममध्ये आज आणखी 2 हजार 98 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 63 हजार 491 पोहचली आहे. ट्विट-

 

 

24 Sept, 03:43 (IST)

तेलंगणा: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मलकाजगिरी विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्त येळमाकुरी नरसिम्हा रेड्डी यांच्याविरोधात बेकायदेशीर मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत सापडलेल्या मालमत्तांचे सरकारी मूल्य सुमारे रु. 7.5 कोटी तर स्थानिक बाजार मूल्य रु 70 कोटी आहे.

24 Sept, 03:02 (IST)

रेल्वे राज्यमंत्री Suresh Angadi यांचे दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले आहे. त्यांची कोरोना व्हायरसची चाचणी सकारात्मक आली होती. एम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

24 Sept, 02:48 (IST)

केंद्रात सत्तेत असलेले भाजप प्रणित एनडीए सरकार पाडता येऊ शकतं, असा विश्वास वंचित बहूजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बिहार विधानसभा निवडणूक 2020 आम्ही  देशाच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानतो. बिहार विधानसभा निवडणुकीत जर एनडीए सरकारचा (जदयु-भाजप) पराभव करता आला तर आम्ही असे मानतो की केंद्रातील विद्यमान सरकारही पाडता येऊ शकते. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हा विश्वास व्यक्त केला आहे.

24 Sept, 02:34 (IST)

दिल्लीत आज दिवसभरात 3,714 जणंना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची आढळून आले. तर 36 जणांचा मृत्यू झाला. 4,465 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

24 Sept, 02:18 (IST)

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून गोंडवाना विद्यापीठास '12 - बी' दर्जा प्राप्त. यामुळे विद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

24 Sept, 02:13 (IST)

मुंबई शहरात आज दिवसभरात 2,360 रुग्णांची नोंद झाली. नव्या नोंदीसह शहरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 27,063 इतकी झाली आहे.

24 Sept, 02:01 (IST)

कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज 1 ऑक्टोबर पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र, कोरोना व्हायरस संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेऊन सभागृहाच्या कामकाजाला स्थगिती देण्यात आली आहे.

24 Sept, 01:47 (IST)

बंदर प्राधिकरण विधेयकास संसदेत मंजूरी देण्यात आली आहे. या विधेयकास शिवसेनेने विरोध दर्शवला होता.

24 Sept, 01:22 (IST)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 21,029 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. कोरोना संक्रमित 479 जणांनी आपले प्राण गमावले. 19,476 नागरिकांना उपचारामुळे बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

24 Sept, 01:19 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यात त्यांनी कोरोना व्हायरस स्थितीचा आढावा घेतला.

24 Sept, 01:06 (IST)

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आलेल्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्यासाठी एनसीबीने अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला समन्स बजावले आहे. समन्स बजावण्यासाठी एनसीबीचे एक पथक श्रद्धाच्या घरीही दाखल झाले आहे.

24 Sept, 24:58 (IST)

मुंसळधार पावसामुळे मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य मुंबई रेल्वेचे अपडेट इथे पाहा.

24 Sept, 24:55 (IST)

खा. छ. संभाजीराजे यांनी तीन पत्र मा. प्रधानमंत्री मोदीजी ना लिहिल्यानंतर सुद्धा मोदींनी "मराठा आरक्षणासारख्या" गंभीर विषयावर भेटीची वेळ दिली नाही हे ऐकून वाईट वाटले. याचा अर्थ आरक्षणावर केंद्र सरकार आणि मोदी गंभीर नाहीत, असा आरप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

24 Sept, 24:48 (IST)
ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन झाले आहे. त्या 84 वर्षांच्या होत्या. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत त्या अलिकडेच दिसल्या होत्या.
24 Sept, 24:45 (IST)

नोएडा Sector 59 येथील इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचाव आणि मदतकार्य सुरु आहे.

24 Sept, 24:39 (IST)

आयपीएल 2020 मध्ये अबूधाबी येथील Sheikh Zayed Stadium येथे सुरु असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स कर्णधार दिनेश कार्तिकचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक कोलकाता नाईट रायडर्सने जिंकली

Read more


मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे काल रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. तसंच भारतीय हवामान खात्याने मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशाराही दिला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय, त्रास टाळण्यासाठी आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच अनावश्यक कारणांनी घराबाहेर जाणे, टाळावे, असे आवाहनही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे चर्चगेट-अंधेरी रेल्वेसेवा खंडीत करण्यात आली आहे. त्यामुळे विरार-अंधेरी विशेष गाड्या धावणार आहेत.

दरम्यान, देशातील कोरोना व्हायरसचे संकट कायम असून काल कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणित 1 लाखांहून अधिक रुग्णांची भर पडली. कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टेस्टिंची संख्याही वाढवण्यात येत आहे. आता दिवसाला 12 लाखांहून अधिक कोविड टेस्ट करण्यात येत आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात 1224380 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 916348 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 274623 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, 33015 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement