उत्तर प्रदेशातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतली आढावा बैठक ; 23 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेटेस्ली मराठीसह जोडलेले राहा...
मुंबईत आज आणखी 1 हजार 470 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 48 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 48 हजार 804 वर पोहचली आहे. ट्विट-
मुंबईत मागील 24 तासांत 1470 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,48,804 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 9966 वर पोहोचली आहे. सद्य घडीला मुंबईत 19,246 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
तामिळनाडूत आज दिवसभरात 3057 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,03,250 वर पोहोचली आहे.
कर्नाटकमध्ये आज दिवसभरात 5356 नवे रुग्ण आढळले असून 51 रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,93,907 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 10,821 वर पोहोचला आहे.
मुंबईतील नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग ही Level 5 असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर आगीवर नियंत्रण मिळवत असताना अग्निशमन दलाचे 5 कर्मचारी जखमी झाले आहेत.
मुंबईतील नागपाडा भागातील सीटी सेंटर मॉलला काल रात्री आग लागली. ही आग लेव्हल-5 ची होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु होते. मात्र यात अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.
देशात सध्या बिहार निवडणूकांचे वारे वाहत आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारचा दौरा करणार आहेत. यासाठी सासाराम मधील बियाडा मैदानावर जय्यत तयारी सुरु आहे. 27 ऑक्टोबर रोजी बिहार निवडणूकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात राजकारणात सध्या एकनाथ खडसे यांची चर्चा आहे. भाजप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरसचे संकट देशात कायम आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला बऱ्याच अंशी यश येत आहे. सध्या देशात 7706947 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 6874519 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 715812 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत 116616 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. येणारा पुढील काळ सणासुदीचा असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.