पुण्यात आज 269 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5436 वर पोहोचली आहे.
उत्तराखंड मधील पौरी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर जंगलाला आज आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे जवळपास 5 ते 6 हेक्टर जंगलाचे नुकसान झाले आहे. अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही.
जेजे मार्ग पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्याने कोरोनाशी यशस्वी लढा दिल्यानंतर पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत केले आहे.
लाहोरहून कराचीला जाणारे पाकिरस्तान आंतरराष्ट्रीय विमान (PIA) कराची (Karachi) विमानतळाजवळील रहिवाशी भागात कोसळले. या भीषण अपघातात आतापर्यंत 97 जण ठार झाले असून दोघे बचावले. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या विमानात एकूण 99 प्रवासी आणि 8 कर्मचारी होते. जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वीच काही मिनिटे अगोदर विमानाचा संपर्क तुटला आणि ते कोसळले. विमानतळाजवळ मॉडेल कॉलनीतील जिना हौसिंग सोसायटी येथे ते कोसळले. हा भाग निवासी असल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
तर दुसरीकडे भारतात (India) कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून अमेरिकेत (America)तर मृतांचा आकडा 95,921 वर जाऊन पोहोचला आहे. ही स्थिती फार चिंताजनक असून गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1260 रुग्ण दगावल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,18, 447 वर पोहोचली असून महाराष्ट्रात रुग्णांची एकूण संख्या 44,582 वर पोहोचली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 2940 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली झाली असून 857 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.