Coronavirus Update: देशात आजवर 71 लाखाहून अधिक कोरोना चाचण्या पार पडल्या; ICMR ची माहिती
यामध्ये कालच्या दिवसभरातच 1 लाख 87 हजार 223 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
COVID 19 Tests: इंडियन मेडिकल काउन्सिल (ICMR) तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार सोमवार, 22 जून पर्यंत देशात एकूण 71 लाख 37 हजार 716 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. यामध्ये कालच्या दिवसभरातच 1 लाख 87 हजार 223 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. याच संदर्भातील मुख्य दिलासादायक बातमी म्हणजे 71 लाखापैकी केवळ 4 लाख 40 हजार 215 चाचण्या या आजपर्यंत पॉझिटिव्ह आल्या आहेत. यातील सुद्धा 1 लाख 78 हजार 14 जण हे अॅक्टीव्ह रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 2 लाख 48 हजार 190 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना मृतांचा आकडा सध्या 14011 वर पोहचला आहे. देशातील कोरोना व्हायरसची आजची आकडेवारी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
देशांतील मुंबई, दिल्ली या शहरांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव अधिक आहे. ही बाब लक्षात घेता दोन्ही ठिकाणचे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून यापूर्वी दररोज 4-5 हजार सॅपल टेस्ट केल्या जात होत्या. त्यांची संख्या आता 9 हजारांवर आणण्यात आली आहे.सुरुवातीच्या काळात या टेस्ट बाबत कमी माहिती असल्याने त्यांचे आकडे कमी होते मात्र आता अधिक चाचण्या घेण्यासाठी सुद्धा तयार असल्याचा विश्वास सरकार तर्फे दाखवण्यात आला आहे.
ANI ट्विट
दरम्यान, मुंबईच्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ने फेवीपिरावीर (Favipiravir) अँटीव्हायरस टॅब्लेटला फॅबिफ्लू (FabiFlu) या ब्रँड नावाने बाजारात आणले आहे. कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी याचा वापर होऊ शकतो. यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून परवानगी सुद्धा मिळाली आहे. जर या औषधाचा पुरेपूर उपयोग झाला तर कोरोनावर मात करण्यासाठी हे एक मोठे पाऊल असू शकते.