पुण्यात गेल्या 24 तासात 820 नवीन कोरोना विषाणू रुग्णांची व 13 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे एकूण संक्रमितांची संख्या 16851 झाली आहे. आतापर्यंत एकूण 617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत आज 846 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची व 42 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे शहरात एकूण संक्रमितांची संख्या 68,481 झाली आहे. यामध्ये 34,576 बरे झालेले रुग्ण, 30,063 सक्रीय रुग्ण आणि 3,842 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात आज 3 हजार 214 रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 39 हजार 10 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट-
राजस्थानमध्ये आज 395 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 हजाराच्यावर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील अकोल्या जिल्ह्यात 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. अकोल्याच्या दक्षिणेस 129 किमी अंतरावर साडेपाचच्या सुमारास हा भूंकपाचा धक्का बसला.
आमच्याकडे दररोज 38,000 चाचण्या करण्याची क्षमता आहे, परंतु आम्ही दररोज केवळ 14,000 चाचण्या घेत आहोत. हे अत्यंत धोकादायक आहे. कंटेन्टमेन्ट झोन बाहेर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जास्त प्रमाणात चाचण्या करणे हा एकमेव उपाय असल्याचं महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी अकरा नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत़. यात 4 पुरूष तर 7 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी ग्रामीण भागात एकाही कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली
मनसे नेते अमित ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला मंत्रालयात दाखल झाले. दरम्यान या भेटीदरम्यान आशा वर्कर्सच्या मानधन वाढीवर चर्चा करण्यात आली. कोरोना संकटात आशा वर्कर्सदेखील कोविड योद्धा म्हणून अग्रस्थानी काम करत होत्या.
ओडिशा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या कार्यालयातूनच लाईव्ह टेलिकास्ट द्वारा जगन्नाथ रथ यात्रेचे दर्शन घेतले. यावेळेस त्यांनी Utkal Prasanga मासिकाच्या रथ जत्रा विशेष आवृत्तीचे उद्घाटन केले.
दिल्ली हिंसाचार प्रकरणामध्ये गरोदर Safoora Zargarला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून तुषार मेहता यांनी विरोध टाळला.
मुंबईमध्ये आज (23 जून) मानखुर्द भागात एका झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. मानखुर्द घाटकोपर लिंक रोड दरम्यान असलेल्या स्क्रॅप कंपाऊंडला ही आग लागली असून 4 अग्निशमनाच्या गाड्या तेथे पोहचल्या आहेत. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आज कोरोनाच्या विळख्यातही ओडिशा येथील पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरूवात झाली आहे. भाविकांना घरबसल्या या रथयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी टेलिव्हिजनवर दूरदर्शनवर थेट दर्शनाची सोय करण्यात आली आहे. चार धामांपैकी एक पुरी चा समावेश असल्याने भाविकांमध्ये त्याची विशेष ओढ आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्याम मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आता 'मिशन झिरो' हातात घेण्यात आलं आहे. यामध्ये मुंबईच्या उपनगरांत उत्तर दिशेला फैलावणारा कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)