पुणे: हडपसर भागात रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया केंद्राला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरु ; 23 जानेवारीच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
पुणे येथील हडपसर भागात रामटेकडी येथील कचरा प्रक्रिया केंद्राला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 11 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
एकविसाव्या शतकात केरळमधील पलक्कड जिल्ह्यात अस्पृश्यतेची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथे सार्वजनिक स्मशानभूमीत एका कुटूंबाला दलित महिलेवर अंतिम संस्कार करण्यास नकार देण्यात आला आहे. ट्वीट-
ट्रॅक्टर परेड गाझिपूर, टिकरी, सिंघु बॉर्डर येथून सुरु होणार असून याबद्दलचा अंतिम निर्णय आज निश्चित होणार असल्याचे आंदोलक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी म्हटले आहे.
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Founder Balasaheb Thackeray) यांची आज 95 वी जयंती साजरी होत आहे. आज बाळासाहेबांच्या पुतळ्याचे अनावर होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंती निमित्त होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाज आज आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संपूर्ण देशभरात उत्सहात साजरी होत आहे. केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ (Parakram Diwas) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाताच्या एल्गिन रोड येथील नेताजी भवनाला भेट देणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, सध्या कोरोना लसीसंदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, कोरोनावरील लस घेण्यात कुठलाही धोका नाही. कोविड प्रतिबंधक लशींची क्षमता व सुरक्षा चांगली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)