महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गायकवाड यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी असे आवाहनही केले आहे.
लोकसभेने जम्मू काश्मीरच्या भाषेबाबत विधेयक मंजूर केले आहे, ज्या अंतर्गत काश्मिरी, डोगरी, हिंदी, विद्यमान उर्दू आणि इंग्रजी या जम्मू-काश्मीरच्या अधिकृत भाषा असतील.
राज्यात आज 18390 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 20206कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 936554रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 272410 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 75.36% झाले आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी जया शहा, श्रुती मोदी आणि मधू मंटेना यांना NCB ने समन्स पाठवले आहेत. तर आता उद्या तिघांची एकत्रित चौकशी एनसीबी कडून होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशामध्ये आता अभिनेत्री आशालता बावगावकर यांनी सातारामध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या शूटिंगसाठी त्या सातारामध्ये होत्या. त्यावेळीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कालपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.
भिंवडीमध्ये काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये बळींची संख्या आता 18 वर पोहचली आहे. काल या घटनेच्या दुर्घटनाग्रस्तांना 5 लाखांची रक्कम मदत म्हणून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान एनडीआरएफ कडून मदतकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना आता रिकव्हरी मध्ये म्हणजे कोरोनामुक्त होणार्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामध्ये सलग तिसर्या दिवशी 90 हजारांपेक्षा अधिक रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.