पुणे शहरात आज नव्याने 1,751 कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्ण संख्या 42,466 झाली आहे. तर 883 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या 16,269 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 2,23,039 झाली असून आज 7,595 टेस्ट घेण्यात आल्या.
राज्यातील इयत्ता नववी आणि अकरावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधीही प्राप्त होणार असल्याचा आशावाद मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास्थान असलेल्या 'राजगृह' परिसरात तोडफेड आणि इमारतीस नुकसान पोहोचवल्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे. विशाल अशोक ( Vishal Ashok) असे या व्यक्तिचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी उमेश जाधव याला 9 जुलै या दिवशीच अटक करण्यात आली आहे. राजगृह परिसरात तोडफोड आणि इमारतीस नुकसान पोहोचविल्याची घटना 7 जुलै रोजी घडली होती.
महाराष्ट्रात आज दिवसभरात 10,576 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरातील आकडेवारीसह राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या 3,37,607 इतकी झाल आहे. यात एकूण 12,556 कोरोना मृतांचाही समावेश आहे. राज्यात आज दिवसभरात 280 कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
तामिळनाडू राज्यातील पहिली प्लाज्मा बँक चेन्नई शहरात आजपासून सुरु झाली. एआयडीएमके पक्षाचे आमदार एन सथन प्रभाकर यांनी पहिला प्लाज्मा देऊन या बँकेस सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. आता त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्य आणि आमदारांच्या घेडेबाजाराविषयी आणि सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नांबाबत आपल्याला माहिती आहे का? की तुमची दिशाभूल केली जात आहे, असे या पत्रात गहलोत यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत मका खेरदीस मुदतवाढ दिली आहे. येत्या 31 जुलै पर्यंत 25 हजार मेट्रिक टन मका खरेदीस ही मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.
लष्कर, बडगाम पोलीस आणि भारतीय सैन्याच्या 50 राष्ट्रीय रायफल आणि 29 बीएन सीआरपीएफ जवानांचा जैश ए मोहम्मद या दशहतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांशी सामना झाला. भारतीय जवानांना बडगाम परिसरातील terror module उद्धव्स्त करण्यात यश आले. येथून तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
धारावी परिसरात आज दिवसभरात केवळ 5 कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबई शहरातील अत्यंत दाटीवाटीचा परिसर अशी या परिसराची ओळख आहे. या परिसरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या आतापर्यंत 2507 इतकी झाली आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहाय्यक कोरोना व्हायरस संक्रमित झाला असल्याचे वृत्त आहे. नुकतीच त्याची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर पटोले यांचे कार्यालय निर्जंतूकीकरण करण्यात आले. तसेच, स्वीय सहाय्यकाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तिंची कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार असल्याचे समजते
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहाय्यक कोरोना व्हायरस संक्रमित झाला असल्याचे वृत्त आहे. नुकतीच त्याची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर पटोले यांचे कार्यालय निर्जंतूकीकरण करण्यात आले. तसेच, स्वीय सहाय्यकाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तिंची कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार असल्याचे समजते
भारताच्या नैऋत्य सागरी क्षेत्रात मालवाहू, मच्छिमारी करणाऱ्या जहाजांच्या परिचालनासाठी आता स्वतंत्र मार्ग असणार आहेत. सागरी सुरक्षा, सागरी वाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्रीय नौवहन विभागानं हा निर्णय घेतला आहे.
भारतात कोरोना विषाणूने धुमाकुळ घातला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, मंगळवारी महाराष्ट्रात तब्बल 8 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 27 हजार 31 इतकी झाली. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
देशातील अनेक दिग्गज कलाकार, नेतेदेखील कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. मंगळवारी औरंगाबादमधील आमदार आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता भाजप पक्षातील एका आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाशी झुंजत असलेले बिहारमधील भाजपा आमदार सुनिल कुमार सिंह यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झालं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. या भूमिपूजनाकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाचं बरखास्त केला तर शहीद झालेल्यांना मानवंदना ठरेल, असं मत व्यक्त केलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)