Coronavirus Update: देशात 24 तासात नवे 69,878 कोरोना रुग्ण; एकुण 29,75,702 कोरोनाग्रस्तांपैकी अ‍ॅक्टिव्ह, डिस्चार्ज व मृत रुग्ण किती पाहा

केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंंत्रालयाच्या माहितीनुसार देशात मागील 24 तासात 69,878 कोरोना रुग्णांची वाढ झाली असुन एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 29,75,702 वर (COVID 19 Total Cases) पोहचला आहे.

Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In India: केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंंत्रालयाच्या माहितीनुसार देशात मागील 24 तासात 69,878 कोरोना रुग्णांची वाढ झाली असुन एकुण कोरोनाबाधितांचा आकडा 29,75,702 वर (COVID 19 Total Cases)  पोहचला आहे. कालच्या दिवसात 945 जणांंचा मृत्यु (Coronavirus Deaths) झाला असुन आजवरच्या कोरोना बळींची संंख्या 55,794 वर पोहचली आहे. सध्या देशात 6,97,330 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Coronavirus Active Cases) आहेत. आजवर 22,22,578 जणांंनी कोरोनावर मात करुन डिस्चार्ज (Coronavirus Recovered Cases) मिळवला आहे. कोरोनाच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी देशात रॅपिड कोरोना टेस्ट घेतल्या जात आहेत. प्राप्त माहितीनुसार 21 ऑगस्ट पर्यंत देशात कोरोनाच्या एकूण 3,44,91,073 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी 10,23,836 चाचण्या या अवघ्या 24 तासाच्या अवधीत कालच्या दिवसात पार पडल्या आहेत.

देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात अनेक राज्यात आता कोरोना रुग्णांच्या वाढीच्या तुलनेत कोरोना रुग्णांंचा रिकव्हरी रेट अधिक असल्याचे दिसुन येत आहे. महाराष्ट्र सहित देशातील कोणत्या राज्यात किती कोरोना रुग्ण आहेत हे जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

ANI ट्विट

दरम्यान, देशात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तरी देखील कोरोना व्हायरसचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे गाफील न राहता आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif